भाजप आमदार जयकुमार गोरेंना पुन्हा दणका; जामीन अर्ज फेटाळला

BJP MLA Jaykumar Gore
BJP MLA Jaykumar Goreesakal
Summary

मुंबई उच्च न्यायालयानं आमदार गोरे यांना तात्पुरतं अटकेपासून संरक्षण दिलं होतं; पण..

BJP MLA Jaykumar Gore : माण-खटाव मतदारसंघाचे (Maan-Khatav constituency) विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांचा मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court) जामीन अर्ज आज (मंगळवार, दि. 14) फेटाळला. येत्या दोन आठवड्यात सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी मुदतही दिली आहे, त्यामुळं आता जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत.

मुंबई उच्च न्यायालयानं आमदार गोरे यांना तात्पुरतं अटकेपासून संरक्षण दिलं होतं. तोपर्यंत आमदार गोरेंना अटक न करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं सातारा पोलिसांना (Satara Police) दिले होते. या प्रकरणाची 9 जून रोजी पुन्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. आज सकाळी या अर्जावर सुनावणीचा आदेश देण्यात आला असून जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

BJP MLA Jaykumar Gore
सौदी अरेबियाला मागं टाकत रशिया ठरला भारताला तेल पुरवठा करणारा सर्वात मोठा देश

मुंबईत उच्च न्यायालयात रेवते-ढेरे पाटील यांच्या कोर्टात सुनावणी झाली. त्याचा आदेश आज सकाळी हायकोर्टानं दिला. ॲड. मनोज मोहिते, ॲड. वैभव. आर. गायकवाड, ॲड. डी. एस. माळी यांनी फिर्यादीची बाजू मांडली. विधानपरिषद निवडणुकीच्या (Legislative Council Election) पार्श्वभूमीवर 20 जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळं आमदार जयकुमार गोरेंना निवडणुकीमुळं मुदत मिळाली, असून 2 आठवड्यात सुप्रीम कोर्टात अपील करावं लागणार आहे.

BJP MLA Jaykumar Gore
Tamil Nadu : आंतरजातीय विवाह केला म्हणून नवविवाहित जोडप्याची हत्या

वडूज जिल्हा सत्र न्यायालयानं (Vaduj District Sessions Court) अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटक टाळण्यासाठी धाव घेतली होती. एका मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्र तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेंच्या अटकपूर्व जामिनावर काही दिवसांपूर्वी न्यायमूर्ती नितीन सांब्रे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली.

BJP MLA Jaykumar Gore
राष्ट्रपतीपदाची निवडणूक शरद पवार लढणार? काय म्हणाले NCP अध्यक्ष..

काय आहे प्रकरण

मायणी गावातील एका जमिनीसंदर्भात बोगस कागदपत्रं (Mayani Fake Documents Case) तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे (विरळी), महेश पोपट बोराटे (बिदाल) यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात एका तलाठ्याचाही समावेश असून तो फरार आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी पोलिसांत फौजदारी तक्रार दिलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com