तज्ज्ञांची टीम मुख्यमंत्र्यांच्या घरची नाही - महापौर पेडणेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kishori Pednekar

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर स्वत: रस्त्यावर उतरल्या असून नागरिकांना आवाहन करता दिसत आहेत. त्यांनी नागरिकांना हात जोडून गर्दी न करण्याचं आणि मास्क घालण्याचं आवाहन केलं.

तज्ज्ञांची टीम मुख्यमंत्र्यांच्या घरची नाही - महापौर पेडणेकर

मुंबई - राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत (Mumbai) आढळत चालली आहे. त्यातच राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर एकीकडे मुंबईमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असताना अनेक सार्वजनिक ठिकाणी मुंबईकर मात्र गर्दी करताना दिसून येतात. अशातच गेटवे (GateWay Of India) परिसरात जाऊन महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी स्वतः आढावा घेतला आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनाही काही सूचना किशोरी पेडणेकर यांनी केल्या आहेत.

दरम्यान, नियमावलीवरूनही विरोधक टीका करताना दिसत आहेत. निर्बंध लागू करताना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला जातो. यावर प्रतिक्रिया देताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, तुम्ही बाहेरच्या पायरीवर बसून नारेबाजी करता. पायरीवर येऊन तुम्हाला विश्वासात घ्यायचं काय? असा सवालही त्यांनी विचारला.

तज्ज्ञांच्या टीमकडून देण्यात आलेल्या सूचनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना महापौर पेडणेकर यांनी कठोर शब्दात सुनावले. त्या म्हणाल्या की, तज्ज्ञांची टीम केंद्राची, महापालिकेची आणि राज्याची असते. तज्ज्ञांची टीम ही मुख्यमंत्र्यांच्या घरातली नाही. ती संपूर्ण राज्याची असते आणि तज्ज्ञ सांगतात त्यावर चर्चा केल्यानंतरच नियमांचा निर्णय होतो. मुख्यमंत्री याला मान्यता देतात असंही पेडणेकर यांनी सांगितलं.

हेही वाचा: "हात जोडते पण मास्क लावा"; महापौर पेडणेकर ग्राऊंडवर

पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी करणार आणि सभागृह आत चालणार, त्यानंतर तुम्ही बोलणार की विश्वासात घेतलं नाही. तुम्ही पायरीवर बसू नका, आत बसा आणि चर्चा करा असं उत्तर महापौर पेडणेकर यांनी विरोधकांना दिलं.

सरकरकडून काल नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. यात पर्यंटनस्थळ यांवरही नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र रविवारी असल्याने नागरिकांनी गेट वे आँफ इंडिया येथे गर्दी केली होती. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर स्वत: रस्त्यावर उतरल्या असून नागरिकांना आवाहन करता दिसत आहेत. त्यांनी नागरिकांना हात जोडून गर्दी न करण्याचं आणि मास्क घालण्याचं आवाहन केलं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :maharashtra
loading image
go to top