भरकटून बुडायला लागलेल्या जहाजासारखी संजय राऊतांची अवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political

खासदार राऊतांची अवस्था भरकटून बुडायला लागलेल्या जहाजासारखी

भरकटून बुडायला लागलेल्या जहाजासारखी संजय राऊतांची अवस्था

राजकीय वर्तुळात हल्ली अनेक घडामोडींनी वेग घेतला आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सध्या टोलेबाजी सुरु आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर आरोप करुन भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), पिंपरी-चिंचवड महापालिका भाजप स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. यासंदर्भात आता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत टीका केली आहे.

हेही वाचा: युक्रेनच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला; बंदुकधारी पोलिसांकडून मारहाण

यात ते म्हणतात, सर्वज्ञानी संजय राऊतजी उत्तर द्याल का?, डोक्यावर परिणाम झाला आणि वास्तवाचं भान हरवलं की असे टेबल न्यूजसारखे आरोप केले जातात. जम्बोचं प्रकरण अंगलट येतंय, याची जाणीव झाल्यावर हे असं दुसऱ्यावर शिंतोडे उडवणे सुरु आहे. खासदार राऊतांची अवस्था भरकटून बुडायला लागलेल्या जहाजासारखी आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा थक्क करणाऱ्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड मनपातील स्मार्ट सिटी घोटाळा ही जनतेच्या पैशांची लूट असून भाजपचेच लोक त्या लुटीचे भागीदार आहेत. नागपूर महापालिकाही या कामी मागे नाही. त्यामुळे भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी युद्धात पुणे, पिंपरी-चिंचवड मनपातील घोटाळ्यांचा समावेश आहे काय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला होता.

हेही वाचा: पुन्हा एक प्रिंस : ७ वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला

Web Title: Mayor Murlidhar Mohol Criticizes Sanjay Raut Saamna Editorial Article

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top