पुन्हा एक प्रिंस : ७ वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला

seven year old boy fell into a borewell
seven year old boy fell into a borewellseven year old boy fell into a borewell

प्रिंस नावाचा मुलगा बोअरवेलच्या (borewell) खड्यात पडला होता. त्याला वाचवण्यासाठी देशभरात प्रार्थना केली गेली होती. त्याला वाचवण्यात प्रशासनाला यशही आले होते. त्यानंतर अनेक चिमुकले खड्ड्यात पडले. काहींना वाचवण्यात यश आले तर काहींचा मृत्यू झाला. पुन्हा असाच एक प्रिंस खड्ड्यात पडल्याची घटना मध्य प्रदेशातील दमोह येथे रविवारी (ता. २७) घडली. प्रियांश असे चिमुकल्याचे नाव आहे. मागील चार दिवसांत मध्य प्रदेशात (madhya pradesh) बोअरवेलमध्ये मुलगा पडल्याची ही दुसरी घटना आहे, हे विशेष... (seven year old boy fell into a borewell)

मध्य प्रदेशातील दमोह जिल्हा मुख्यालयापासून ४५ किमी अंतरावर असलेल्या पटेरा पोलिस ठाण्याच्या बारखेडा गावात ही घटना घडली. प्रियांश नावाचा सात वर्षांचा मुलगा खेळता खेळता बोअरवेलमध्ये (borewell) पडला. ही बोअरवेल ३०० फूट खोल आहे. व्यवस्थित झाकले न गेल्याने ही घटना घडली. ही बोअरवेल मुलाचे वडील धर्मेंद्र आत्या यांनी शेतात खोदली होती. प्रियांश येथे खेळत असताना दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यात पडला, असे पटेरा पोलिस स्टेशनचे प्रभारी श्याम बिहारी मिश्रा यांनी सांगितले.

seven year old boy fell into a borewell
राणेनंतर भाजपच्या ‘या’ नेत्याने अपशब्दात मुख्यमंत्र्यांना खडसावले

१० ते १५ फूट खोलीवर मुलगा अडकला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. बचावकार्य जोरात सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी तीन वर्षांचा मुलगा २०० फूट खोल बोअरवेलमध्ये (borewell) पडला होता. उमरिया जिल्ह्यातील (madhya pradesh) बदरचाड गावात ही घटना घडली होती. १६ तासांच्या बचावकार्यानंतर मुलाला बाहेर काढण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com