वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया आजपासून; असे आहे वेळापत्रक! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पुणे : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया सात जूनपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना 19 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज भरावयाचा आहे. या कालावधीत ऑनलाइन अर्जाची प्रिंट काढून आवश्‍यक कागदपत्रांच्या मूळ प्रतींसह सुुविधा केंद्रावर (फॅसिलिटी सेंटर) जायचे आहे. तेथे कागदपत्रांची पडताळणी होईल, ती अपलोड केली जातील. त्यानंतर विद्यार्थ्यांचा अर्ज निश्‍चित केला जाईल. अर्जनिश्‍चितीनंतर त्याची पोच विद्यार्थ्यांनी न विसरता घ्यायची आहे. 

तपशील मुदत
ऑनलाइन अर्ज भरणे 7 ते 17 जून
स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये चलनासह  
शुल्क भरण्याची अंतिम मुदत 
18 जून
संभाव्य गुणवत्ता यादी प्रसिद्धी 19 जून (सायं 5नंतर)
प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पडताळणी 21 ते 25 जून
अंतिम गुणवत्ता यादी 26 जून
ऑनलाइन पसंतीक्रम भरणे 26 ते 29 जून
पहिल्या फेरीची निवड यादी प्रसिद्धी 2 जुलै
पहिल्या फेरीत मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश 12 जुलै
महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज सुरू 1 ऑगस्ट

कागदपत्रांची पडताळणी 

 • बी. जे. वैद्यकीय महाविद्यायल, पुणे 
 • ग्रॅंट सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, भायखळा 
 • आर. ए. पोदार आयुर्वेदिक महाविद्यालय, वरळी 
 • सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर 
 • सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालय, नागपूर 
 • सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (घाटी रुग्णालय) औरंगाबाद 
 • सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालय, नांदेड (वझिराबाद) 
 • सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालय, उस्मानाबाद 

वैद्यकीय प्रवेशासाठी संकेतस्थळ : www.mahacet.org आणि www.dmer.org 
अभियांत्रिकी प्रवेशासाठी संकेतस्थळ : www.mahacet.org आणि www.dtemaharashtra.gov.in 

महत्त्वाच्या सूचना 

 • विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर "सबमिट' बटणावर क्‍लिक करायचे आहे. त्यानंतर प्रवेश अर्ज प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. 
 • अर्ज सबमिट केल्यानंतर शुल्काचे चलन तयार होईल. तेवढी रक्कम विद्यार्थ्यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत भरायची आहे. 
 • चलनासह शुल्क भरल्यानंतर विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी अधिकृत मानली जाईल. 
 • विद्यार्थी एकापेक्षा अधिक अर्ज ऑनलाइन भरू शकतो. परंतु त्याने चलनासह शुल्क भरल्यानंतर तेवढाच अर्ज गाह्य मानला जाईल. अन्य अर्ज बाद ठरतील. 
 • प्रवेश प्रक्रियेच्या सुरवातीलाच आरक्षणाचा दावा केला नाही, तर नंतरच्या प्रक्रियेत योग्य कागदपत्रे असूनही आरक्षणाचे लाभ मिळणार नाहीत. 
 • विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान आवश्‍यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. मूळ कागदपत्रे पडताळणीवेळी तपासली जातील. 
Web Title: Medical admission 2018 schedule in Maharashtra