
संभाजीनगर : राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून उद्या दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत महत्वाची बैठक पार पडणार आहे. याच बैठकीत मुख्यमंत्री कोण असेल? यावर शिक्कामोर्तबही होईल. तसंच मंत्रिमंडळाचा पॅटर्न कसा असेल? आणि इतर कुठल्या महत्वाच्या बाबींवर चर्चा होणार आहे, याची माहिती राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी नगर इथं बोलताना दिली.