महाराष्ट्रात जे काही चाललंय ती चांगली गोष्ट नाहीय; राज ठाकरेंचं राज्याच्या राजकारणावर मोठं भाष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

सध्याच्या अस्थिर परस्थितीकडं एक संधी म्हणून बघा म्हणत (MNS) मनसे प्रमुख (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरवात केलीय.

महाराष्ट्रात जे काही चाललंय ती चांगली गोष्ट नाहीय; राज ठाकरेंचं राज्याच्या राजकारणावर मोठं भाष्य

मुंबई : सध्याच्या अस्थिर परस्थितीकडं एक संधी म्हणून बघा म्हणत (MNS) मनसे प्रमुख (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरवात केलीय. शस्त्रक्रियेनंतर प्रथमच आज राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली. केवळ महापालिका निवडणुकाच नव्हे मनसे आता स्थानिक पातळीपासून ते लोकसभेपर्यंतच्या तयारीला लागली असल्याचं चित्र आहे.

मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले, माझा शस्त्रक्रियेचा अनुभव खूप भयंकर होता. माझ्या शस्त्रकियेला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. कोरोनामुळं माझ्या हाडांचा आजार बळावलाय, असं त्यांनी मेळाव्यात स्पष्ट केलं. मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी शस्त्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती दिली.

हेही वाचा: 'मुख्यमंत्र्यांना व्यक्तिगत लफड्यात, अनैतिक संबंधांत कोणता विकास साध्य करायचाय?'

राज ठाकरे म्हणाले, मी उद्या पुण्याला जाणार आहे. याशिवाय, नाशिकला सुध्दा मी जाणार आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही बैठकांचं आयोजन करु नका, असा सल्ला दिला. यावेळी त्यांनी पत्रकारांना देखील टोमण्णा लगावला. आज आपल्या पक्षाबाबत काही राजकीय पक्षांकडून अपप्रचार केला जात आहे. त्यामुळं आपण सर्तक रहायला हवं. मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा चुकीचा आरोप आहे. आम्ही राज्यात 65 ते 67 टोलनाके बंद केले आहेत. मात्र, शिवसेना सत्तेत असताना त्यांनी काय केलं. त्यांच्या जाहीरनाम्यात टोलमुक्त महाराष्ट्र असा उल्लेख केला होता त्याचं काय झालं? टोलचा पैसा जातो कुठे हा आपला मुळं प्रश्न होता. टोलबाबत कोणतीही उत्तर सरकारकडून मिळाली नाहीत. सत्ता हातात द्या, सगळे टोल बंद करतो, असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं.

हेही वाचा: Britain PM Election : माझ्याकडं गमावण्यासारखं काहीच नाही, पण मी मागं हटणार नाही : ऋषी सुनक

ठाकरे पुढं म्हणाले, पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार 92-93 भोंगे बंद झाले. बाकीच्या प्रार्थनाही आता कमी आवाजात ऐकालायला येतात. आणि ह्या भोंग्यांबद्दचं ते पत्र होतं. मी हे पत्र फेसबुक, ट्विटर, व्हाॅटसअॅपवर टाकू शकलो असतो. पत्रकार परिषद घेऊनही ते पत्र दाखवू शकलो असतो. पण, मी हे पत्र तुमच्या हातात का दिलं? मला पहायचं होतं तुमचा आणि समाजाचा किती संपर्क आहे. तुम्ही लोकांपर्यंत कसे पाहोचता, लोकांकडं जाताय की नाही जाताय. याबाबत काहींनी मोठ्या प्रमाणात हालगर्जीपणा केला. सगळे थंड झालेत. निवडणुकीचे वारे फक्त डोक्यामध्ये आहे. दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात जे काही चाललंय ती काही चांगली गोष्ट नाहीय. याआधी असं कधी नव्हतं. कोण कोणामध्ये मिसळलाय आणि कोण कोणासोबत गेला काहीत कळतं नाहीय, असं राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं.

Web Title: Meeting Of Mumbai Mns Raj Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..