मुख्यमंत्र्यांना व्यक्तिगत लफड्यात, अनैतिक संबंधांत कोणता विकास साध्य करायचाय? NCP नेत्याचा थेट सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rupali Patil-Thombare vs CM Eknath Shinde

'मुख्यमंत्री साहेब.. आमदारांच्या संमतीच्या लफडे, अनौतिक संबंध यावर बोलतात.'

'मुख्यमंत्र्यांना व्यक्तिगत लफड्यात, अनैतिक संबंधांत कोणता विकास साध्य करायचाय?'

विधीमंडळाच्या अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस (Maharashtra Monsoon Session) चांगलाच गाजला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना उद्देशून केलेल्या वक्तव्याची चांगली चर्चा झाली. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombare) यांनी ट्विटव्दारे प्रतिक्रिया दिलीय.

हेही वाचा: Karnataka : मुख्यमंत्रिपदाची 'खुर्ची' 2500 कोटींना विकली; काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, धनंजय मुंडे ही तिकडे किती ओरडत होते. ते एवढ्या जोरात ओरडत होते की, जसे मूळचे शिवसैनिक वाटत होते. तुमचा घसा खराब होईपर्यंत ओरडला. तुमचा सर्व प्रवास मला माहिती आहे. त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रेम, करुणा, दया दाखवली, त्यामुळं हे झालं. पण, ती परत-परत ती दाखवता येणार नाही, असा टोला त्यांनी काल धनंजय मुंडेंना लगावला. याच पार्श्वभूमीवर रुपाली पाटील-ठोंबरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

हेही वाचा: लोकसभेत 350 जागा जिंकणार, पटनायकांनी NDA मध्ये सामील व्हावं; रामदास आठवलेंची खुली ऑफर

रुपाली पाटील-ठोंबरे यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, काय दिवस आलेत महाराष्ट्राला! मुख्यमंत्री साहेब.. आमदारांच्या संमतीच्या लफडे, अनौतिक संबंध यावर बोलतात. त्यांना यातून काय सिद्ध करायचं आहे, काय उद्दिष्ट्ये आहेत. व्यक्तिगत लफड्यात, अनैतिक संबंधात कोणता विकास साध्य करायचा आहे? ते तर सांगा, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केलाय.

Web Title: Ncp Leader Rupali Patil Thombare Criticized Cm Eknath Shinde Over Dhananjay Munde Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..