मेगाभरती 72 हजारांची, नोकरीच्या रांगेत 6 लाख

मेगाभरती 72 हजारांची, नोकरीच्या रांगेत 6 लाख

नाशिक : राज्य सरकारच्या 72 हजार पदांच्या मेगा भरतीचे आश्‍वासन दाखवून एकाबाजूला नोकरीच्या प्रतीक्षेतील लाखो बेरोजगारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे राज्यात सुमारे 6 लाख 12 हजारांहून अधिक बेरोजगार शासकीय नोकरीकडे आस लावून आहेत, त्यामुळे मेगाभरतीत "आपला वाटा निश्‍चितीसाठी हे सगळे कंत्राटी व बेरोजगार लढ्याच्या तयारीला लागले आहेत. 

राज्य शासनाने 72 हजार पदांसाठी भरतीचे नियोजन केले आहे. या भरतीच्या अपेक्षेने अनेक सुशिक्षित बेरोजगार त्याकडे अपेक्षेने पाहत आहेत. दुसरीकडे राज्यात 5 लाख कंत्राटी कर्मचारी विविध शासकीय खात्यांत गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना या भरतीत त्यांचा वाटा हवा आहे. हा वाटा मिळविण्यासाठी ते मंत्रालयापर्यंत महामोर्चा काढून लक्ष वेधण्याच्या तयारीत आहेत. 1 लाख प्रकल्पग्रस्त आहेत, ते अद्यापही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. शासकीय प्रकल्पांसाठी जमिनी दिलेल्यांना शासनाच्या विविध आस्थापनांनी नोकर भरतीत राखीव जागांचे आश्‍वासन दिले आहे, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनाही मेगाभरतीत मोठ्या अपेक्षा आहेत. 

तिसरा क्रमांक अनुकंपा तत्त्वावरील बेरोजगारांचा आहे. राज्यात 12 हजार अनुकंपाग्रस्त आहेत. 10 वर्षांपूर्वी शासनाने त्यांच्यातील काही जणांना सामावून घेतले. त्यानंतर अनुकंपा तत्त्वावरील भरतीत फक्त 5 टक्‍के भरती बिंदुनामावलीप्रमाणे करण्याचे धोरण आहे. तेव्हापासून त्यांना आई- वडिलांच्या जागेवर नोकरी मिळणे अशक्‍य झाले आहे. त्यांना या भरतीत भरघोस वाटा हवा आहे. कारण त्यांना वयाच्या 45 वर्षांपर्यंत भरती होता येते. मात्र, सध्या भरतीच बंद असल्याने दरवर्षी 200 जण वयोमर्यादा ओलांडत असल्याने त्यांचा नोकरीचा मार्ग बंद होत आहे. 

अनुकंपा घर का ना घाट का 

अनुकंपा तत्त्वावर घरातील एकाला नोकरी मिळते. ज्या वेळी दोन भाऊ असतात, तेव्हा ते एकमेकांशी चर्चा करून कोणाला अनुंकपा नोकरीवर जायचे ते निश्‍चीत करतात. त्यानंतर शेती, घराचे वाटे हिस्से पडतात. एकाला नोकरी व दुसऱ्याला घर, शेती मिळते. मात्र, अनुकंपावर जेव्हा त्याला नोकरी मिळत नाही, तेव्हा त्याची अवस्था बिकट होते. इकडे घर, शेतीतील वाटा सोडलेला असतो, त्यामुळे घर का ना घाट का अशी त्याची स्थिती होते. सध्या बऱ्याच ठिकाणी असे वाद निर्माण झाले आहेत. 

आकडे बोलतात 

नोकरीच्या प्रतीक्षेतील उमेदवार 
5 लाख 
कंत्राटी कर्मचारी 

1 लाख 
प्रकल्पग्रस्त 

12 हजार 
अनुकंपाग्रस्त 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com