लतादीदींच्या पत्रातून उलगडल्या नाशिकमधील आठवणी | Lata Mangeshkar

Lata Mangeshkar
Lata Mangeshkaresakal

नाशिक : दैवी आवाज अशा शब्दांत ज्यांच्या गायकीचं वर्णन अनेकांनी केलं, त्या देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे वार्धक्यानं निधन झाले आहे. त्या 93 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली आहे.

लता दीदींच्या अनेक आठवणी नाशिकशी जुळलेल्या आहे. अनेक कार्यक्रमांच्या निमीत्ताने लतादिदींचे नाशिकमध्ये येण झाल. 1968 साली लतादीदींनी नाशिकमधील एका कार्यक्रमासंबंधी स्वतः लिहीलेले पत्र पाठवले होते.

Lata Mangeshkar
लतादिदींच्या नाशिकमधील आठवणींची क्षणचित्रे | Lata Mangeshkar

1968 साली नाशिकमधील कलावंताना हक्काच व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी नाशिक शहर सांस्कृतिक महामंडळातर्फे मधुरगीत गायन स्पर्धा (Golden singing competetion) आयोजित करण्यात आली होती. याच स्पर्धेला पाहुणे म्हणून लतादीदींना आमंत्रित करण्यात आले होते. महामंडळाच्या या विनंतीला प्रतिसाद देणार पत्र लतादीदींनी महामंडळाचे तत्कालीन सरचिटणीस वासुदेव दशपुत्रे यांच्या नावे स्वःहस्ते लिहून पाठवले होते.

नाशिक शहर सांस्कृतिक महामंडळाचे तत्कालीन सरचिटणीस वासुदेव दशपुत्रे यांच्या नावे लतादीदींनी स्वतः पत्र लिहून पाठवले होते.
नाशिक शहर सांस्कृतिक महामंडळाचे तत्कालीन सरचिटणीस वासुदेव दशपुत्रे यांच्या नावे लतादीदींनी स्वतः पत्र लिहून पाठवले होते.esakal
लता दीदींनी लिहीलेले पत्र.
लता दीदींनी लिहीलेले पत्र.esakal

या स्पर्धेला लतादीदी स्वतः उपस्थित राहील्या नव्हत्या, त्याच आशयाचे हे पत्र त्यांनी महामंडळाला पाठवले होते.

आज त्यांच्या हस्ते लिहीलेल्या या पत्रामुळे लतादीदींचे नाशिकसोबत असलेल्या ऋणानुबंधांना व त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

Lata Mangeshkar
लतादिदींच्या नाशिकमधील आठवणी;पाहा व्हिडीओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com