Abdul Sattar: नॉट रिचेबल असलेल्या सत्तारांचा आला मेसेज; जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर म्हणाले...

पदाचा गैरवापर करुन मोठी गायरान जमिनीत सत्तारांनी घोटाळा केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे.
Abdul Sattar
Abdul Sattaresakal

नागपूर : वाशिम येथील कथीत जमीन घोटाळाप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला होता. या आरोपांवर आता सत्तारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर सभागृहात आरोप झालेत तर याला मी सभागृहातच उत्तर देईन असं त्यांनी म्हटलं आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे. (Message from Abdul Sattar who is not reachable He said on allegations of land scam)

Abdul Sattar
New Year 2023: पुणेकरांचा थर्टी फस्ट यंदा जोरात; 'वन डे परमिट'साठी लाखांवर अर्ज

अब्दुल सत्तार यांच्यावर सकाळी विधानसभा, विधानपरिषदेत जोरदार आरोप झाले यानंतर ते नॉट रिचेबल असल्याचं सांगतलं जात आहे. सकाळपासूनच अब्दुल सत्तार कुठे आहेत? अशा प्रकारची चर्चा सुरु होती. पण नागपूरमधील कृषी विभागाच्या संशोधन कार्यालयात ते पोहोचले आहेत. याठिकाणी त्यांनी स्वतः मीडियाशी न बोलता कृषी अधिकाऱ्यांच्यामार्फत मीडियापर्यंत मेसेज पोहोचवला. या मेसेजमध्ये "आपल्यावर सभागृहात आरोप झालेत तर त्याला उत्तरही आपण सभागृहातच देऊ" असं त्यांनी म्हटलं आहे.

Abdul Sattar
Maharashtra-Karnataka Issue: "आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत, वातीही काढल्यात फक्त..."; ठाकरेंचा सरकारला इशारा

सत्तार यांनी म्हटलं की, "सध्या या संपूर्ण विषयाची माहिती आपण घेत आहोत. तसेच या ठिकाणाहून आपण बाहेर पडणार नाही पण उद्या सभागृहातच त्यावर उत्तर देणार आहे.

हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

सत्तारांवर विरोधकांनी काय केलेत आरोप?

सत्तारांवर विरोधकांनी जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ३७ एकर गायरान जमीन ज्याची किंमत १५० कोटी रुपये आहे. ही जमिनीच्या व्यवहारात सत्तारांनी हस्तक्षेप करत ती मोकळी करुन दिली, असा आरोप विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सभागृहात केली होती. सत्तारांकडून पदाचा दुरुपयोग झाला त्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अजित पवारांनी विधानसभेत केली. राजीनाम्याच्या मागणीनंतर आता अब्दुल सत्तार यांचा फोन बंद असल्याचं समोर आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com