
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आले असून अनेक भागात रस्त्यांना देखील नद्यांचे स्वरूप आहे आले. पावसाच्या संततधारमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अशातच आता पुढील तीन तास महत्त्वाचे असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.