राज्यात पाच दिवस पावसाचा जोर वाढणार 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

राज्यातील विविध भागांमध्ये मौसमी पाऊस आणखी प्रबळ होईल असे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात जोरदार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे -  राज्यात बुधवारी (ता. 19) बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. तर पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बुधवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकण येथील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून पुढील 24 तासांमध्ये त्याची तीव्रता वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे चक्राकार वाऱ्यांचा प्रवाह पण वाढेल. परिणामी राज्यातील विविध भागांमध्ये मौसमी पाऊस आणखी प्रबळ होईल असे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात बहुतांश भागांमध्ये (76 टक्‍क्‍यांहून अधिक भागात) जोरदार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे, तर 22 ते 23 ऑगस्ट दरम्यान कोकण गोव्यातील तुरळक ठिकाणी पावसाची अतिवृष्टी होण्याचीही दाट शक्‍यता आहे. मराठवाड्यात बहुतांश भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील. अशी माहिती हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्‍यपी यांनी दिली. शहरात बुधवारी 0.8 मिलिमीटर तर लोहगाव येथे 0.3 मिलिमीटर इतका पावसाची नोंद झाली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बुधवारी राज्यातील पावसाची नोंद 
ठिकाण : पाऊस (मिलिमीटर मध्ये) 
मध्य महाराष्ट्र : 8.3 
मराठवाडा : 3.2 
कोकण गोवा : 37.2 
विदर्भ : 5.6 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meteorological department has forecast heavy rains in the state