

Maharashtra Cold Wave
ESakal
महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यभर तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. परंतु विदर्भात किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. हवामान खात्यानुसार, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात तापमानात घट झाली आहे. दोन्ही ठिकाणी तापमान ९ अंश सेल्सिअस आहे.