

Maharashtra Monsoon Update
ESakal
मुंबई : महाराष्ट्रसह मुंबईतील काही उपनगरांत सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र इतर काही भागात उष्णता वाढत चालली असून परिणामी नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे नागरिकांना मान्सूनची प्रतिक्षा असतानाच याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.