
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर मागील दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून वाहतूक ठप्प झाली. तसेच जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांचे हाल झाल्याचे समोर आले. मात्र आज मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान हवामान विभागाने राज्यभरात उद्याच्या हवामानाबद्दल अपडेट जारी केले आहेत.