

IMD Update For Maharashtra
ESakal
हवामान विभागाने (IMD) पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस थंडीचा इशारा दिला आहे. सोमवारी काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. शनिवारी पुण्यात रात्रीचे तापमान ११.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. सोमवारपर्यंत पारा हाच पातळीवर राहण्याची शक्यता आहे. शिवाय शहराच्या अनेक भागात कमाल तापमान आता ३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे.