#MeToo : नवाजुद्दीन सिद्दिकीवर माजी मिस इंडिया निहारिका सिंगचा आरोप 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

मुंबई : माजी मिस इंडिया निहारिका सिंगने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीवर आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप "मी टू' मोहिमेंतर्गत केला आहे. तिने यासंबंधी लिहिलेली मोठी पोस्ट संध्या मेनन यांनी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये निहारिकाने नवाजुद्दीनने आपल्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे. 

मुंबई : माजी मिस इंडिया निहारिका सिंगने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीवर आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप "मी टू' मोहिमेंतर्गत केला आहे. तिने यासंबंधी लिहिलेली मोठी पोस्ट संध्या मेनन यांनी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये निहारिकाने नवाजुद्दीनने आपल्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे. 

"मिस लवली' चित्रपटाच्या वेळी त्या दोघांची ओळख झाली. एक दिवस निहारिका घरी असताना नवाज तिच्या घराजवळच्याच भागात संपूर्ण रात्रभर चित्रीकरणात व्यस्त होता. म्हणून निहारिकाने त्याला सकाळी नाश्‍त्यासाठी घरी बोलावले. निहारिकाने नवाजुद्दीनसाठी दरवाजा उघडला तेव्हा त्याने तिला अचानक मिठी मारली. मी स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवण्याचा प्रयत्न केला पण ते शक्‍य झाले नाही, असेही तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. मला परेश रावल किंवा मनोज वायपेयी यांच्यासारखी मिस इंडिया किंवा अभिनेत्री असलेली पत्नी हवी आहे, असे वक्तव्य नवाजने केल्याचा दावाही निहारिकाने केला आहे. "मिस लव्हली' चित्रपटादरम्यान नवाज आणि माझे चांगले संबंध होते. नवाजचे अनेक मुलींबरोबर प्रेमसंबंध असून तो त्यांना फसवतो हे कळल्यानंतर त्याचे खरे रूप माझ्यासमोर आल्यामुळे मी त्याच्याबरोबरचे संबंध तोडले, असेही निहारिकाने म्हटले आहे. 

"अ न्यू लव्ह स्टोरी' या चित्रपटात काम देण्याच्या निमित्ताने भूषण कुमार यांनी डेटवर जाऊ असा मेसेज केल्याचाही आरोप निहारिकाने केला आहे. मागील वर्षी नवाजुद्दीनने आत्मचरित्रात निहारिकाबरोबर प्रेमसंबंध असल्याचे म्हटले होते. त्या वेळीही निहारिकाने परवानगीशिवाय पुस्तकात नाव छापल्याचा नवाजवर आरोप केला होता. 

"सॅक्रेड गेम्स' फेम कुब्रा सैतने ट्विटरद्वारे नवाजुद्दीन सिद्दिकीची बाजू घेतली आहे. "मीटू' मोहीम आणि खासगी नातेसंबंधांतील अडचणी यांमधला फरक जाणून घेतला पाहिजे असे ट्विट तिने केले आहे. निहारिकाने तिच्या कारकिर्दीत अनेक अडचणींना तोंड दिले असेल म्हणून तिने खासगी नातेसंबंध आणि "मीटू' मोहीम यात गफलत करून चुकीचे विधान करू नये. प्रत्येक माणसाकडून चुका होतात आणि त्यात स्त्री किंवा पुरुष असा भेदभाव करता येत नाही, असेही कुब्रा सैतने म्हटले आहे. 

Web Title: MeToo Nawazuddin Siddiquis allegations against former Miss India Niharika Singh