
Ladki Bahin Scheme Budget Reduction: राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांचा डेटा इतर सर्व सध्याच्या योजनांसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जेणेकरुन योजनांचा दुहेरी आणि चुकीचा लाभ घेणा-या लाभार्थ्यांना यातून वगळण्यात येईल. त्यामुळे राज्यावरील वाढता आर्थिक बोझा कमी होईल.
या प्रक्रियेमुळे राज्यातील 2. 46 कोटी लाडक्या बहिणींपैकी किमान 25 टक्के लाभार्थी वगळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारची दरमहा 900 कोटी रुपयांची बचत होईल असे सांगितले जात आहे.