
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाने आता सर्वसामान्यांसाठी खुशखबर दिलीय. दिवाळी आधी म्हाडाकडून बंपर लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात जवळपास १९ हजार ५०० सदनिका बांधण्याचं उद्दिष्ट आहे. यापैकी एकट्या मुंबईत ५ हजार घरांचं उद्दिष्ट आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी याबाबत माहिती दिलीय. म्हाडाच्या सदनिकांसाठी अर्थसंकल्पात ९२०२.७६ कोटींची तरतूद करण्यात आलीय.