म्हैसलगी खून खटल्यात चौघांना जन्मठेपेची शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

सोलापूर - म्हैसलगी (ता. अक्कलकोट) येथील भीमाशंकर बिराजदार यांच्या खून खटल्यातील चौघा आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. सावंत-वाघुले यांनी गुरुवारी ठोठावली. 

संतोष बिराजदार, हणमंत सालोटगी, मुदकण्णा पुजारी, सिद्धाराम बिराजदार अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तडवळ-म्हैसलगी रस्त्यावर 7 फेब्रुवारी 2014 रोजी रात्री भीमाशंकर बिराजदार यांचा खून करण्यात आला होता. भीमाशंकर बिराजदार हे गावातील विविध प्रकरणांवर न्यायनिवाडा करीत होते. एका प्रकरणात बिराजदार यांनी आरोपींच्या विरोधात निकाल दिला होता. त्याच कारणावरून चिडून संतोष बिराजदार व त्यांच्या साथीदारांनी भीमाशंकर बिराजदार यांचा खून केला होता. 

Web Title: Mhaisalagi murder case