esakal | मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, चिंता नको : शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad pawar

राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात एकत्र बैठक होणार असून, त्यानंतर शिवसेनेसोबत प्रस्ताव ठेवण्यात येण्यात येणार आहे. राज्यात सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वेळ मिळणार आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नवाब मलिक हे चर्चा करणार आहेत. 

मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, चिंता नको : शरद पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात पुन्हा मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, चिंता नको. राष्ट्रपती राजवट लागू असली तरी काळजी करायची गरज नाही. नव्या आमदारांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर विविध चर्चांना वेग आला आहे. आज (बुधवार) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची वाय. बी. चव्हाण सभागृहात बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सध्याच्या स्थितीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीला विजयी व पराभूत नेते उपस्थित होते.

कर्नाटकातील 'ते' 17 आमदार अपात्रच; पण निवडणूक लढवू शकणार

राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात एकत्र बैठक होणार असून, त्यानंतर शिवसेनेसोबत प्रस्ताव ठेवण्यात येण्यात येणार आहे. राज्यात सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वेळ मिळणार आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नवाब मलिक हे चर्चा करणार आहेत. 

राष्ट्रपती राजवट

आज वसंतदादा पाटील यांची जयंती असल्यामुळे त्यांच्या विधानभवन परिसरातील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार विधान भवनात आले होते.  त्यानंतर त्यांनी सभापतींकडे चहापान घेऊन पुढील आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी सर्व मंडळी रवाना झालेली आहेत. यावेळी विधान भवनाबाहेर पडताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर सदस्यांच्या आग्रहास्तव पवार साहेबांनी सर्वांसमवेत एक छायाचित्र काढले.

loading image