दूध लिटरला दोन रुपयांनी महागले 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 जानेवारी 2017

मुंबई - राज्यात येत्या बुधवारपासून ता. 11 दूध प्रति लिटर दोन रुपयांनी महागणार आहे. यामुळे ग्राहकांस दोन रुपये एका लिटरला जास्तीचे मोजावे लागणार आहे. याबाबत खासगी आणि राज्य सहकारी दूध संघाची बैठक पुण्यातील कात्रज जिल्हा दूध संघाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या वेळी हा निर्णय घेण्यात आला. 

या बैठकीला महाराष्ट्र राज्य सहकारी व खासगी दूध संघ कृती समिती अध्यक्ष विनायकराव पाटील, उपाध्यक्ष योगेश म्हस्के, चितळे डेअरीचे गिरीश चितळे आदी उपस्थित होते. 

या वेळी गाईच्या खरेदीदरात 3 रुपयांची वाढ, विक्रीदरात 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडून 22 रुपये प्रतिलिटरने खरेदी करण्यात येणारे दूध आता 25 रुपये प्रतिलिटरने खरेदी करण्यात येणार आहे. तर यापूर्वी दुधाची विक्री 40 रुपये प्रतिलिटरने करण्यात येत असे, मात्र आता याची विक्री 42 रुपये प्रतिलिटरने करण्यात येणार आहे. याशिवाय म्हशीच्या दुधाच्या दरातही लवकरच वाढ करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगितले. दूध महागाईबाबत या क्षेत्रातील जाणकार श्री. नाईक म्हणाले, की दूध उत्पादक शेतकऱ्यांना जो दर दिला जातो. तितके पैसे दूध संघाकडून मिळतात का, हा खरा कळीचा प्रश्‍न आहे. ही दरवाढ ग्राहकांचा खिसा कापणारी आहे.

Web Title: milk increases two rupee