दूध भुकटी अनुदानात ; शेतकऱ्यांची दिशाभूल 

तात्या लांडगे
रविवार, 20 मे 2018

शासनाकडे यापूर्वी असलेली दूध पावडर विक्रीविना पडून आहे. तरीही शासन पुन्हा दूध पावडर तयार करण्यासाठी अनुदान देणार आहे. ऑक्‍टोबरपासून दुधाच्या संकलनात मोठी वाढ होते. त्यामुळे अतिरिक्‍त दुधाचा प्रश्‍न सोडविण्याकरिता शासनाने शालेय पोषण आहारात दुधाचा उपयोग करणे हा उत्तम पर्याय राहील. 
- सतीश मुळे, व्यवस्थापकीय संचालक, दूधपंढरी  

सोलापूर : पुणे विभागाचे दूध संकलन तब्बल 1 कोटी 26 लाख लिटर आहे. मात्र, शेतकऱ्यांकडील दूध खरेदी करून त्यापासून भुकटी तयार करण्यासाठी भुकटी प्रकल्पांची नापसंती असून, आतापर्यंत केवळ 7 भुकटी प्रकल्पांनीच त्यासाठी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे उर्वरित दुधाचा प्रश्‍न पुन्हा "जैसे थे'च राहण्याची शक्‍यता आहे. 

शासनाने दुधाचे दर वाढविल्याने सहकारी दूध संघ अडचणीत सापडल्याने काही संघांनी शासनादेश डावलून कमी दर देण्यास सुरुवात केली. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, याकरिता शासनाने भुकटी प्रकल्पांना तीन रुपयांचे अनुदान जाहीर केले.

परंतु, हा निर्णय केवळ 11 जूनपर्यंतच लागू राहणार असून, मार्च महिन्यात जेवढ्या दुधाची भुकटी तयार केली आहे. त्याच्या तुलनेत 20 टक्‍के अधिक दुधाची भुकटी तयार केली, तरच संबंधित प्रकल्पांना अनुदान मिळणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बहुतांशी भुकटी प्रकल्पांनी शासन निर्णयाला बगल दिली आहे. 

आकडे बोलतात..... 
एकूण दूध संकलन 
1,26,36000 लिटर 
भुकटी प्रकल्प 

भुकटीसाठी लागणारे दूध 
29,48,470 लिटर 
अतिरिक्‍त दूध 
53,29,653 लिटर 

 
 

Web Title: Milk powder subsidy Misleading farmers