काय सांगता ! ते बनवायचे बनावट खवा; एफडीएच्या कारवाईत लाखोंचा माल जप्त

Milk Product Khawa fake sales racket exposed by FDA
Milk Product Khawa fake sales racket exposed by FDA

पुणे : दुधाच्या पावडरपासून तयार केलेला बनावट खवा विक्रीचे रॅकेट अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मंगळवारी उघड केले. कोल्हापूरमध्ये तयार केलेला बनावट खवा बार्शीला घेऊन जात. तेथून तो राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये विक्रीसाठी पाठवला जात होता. या प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यातील तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांतून 18 लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद या भागातून खवा विक्रीसाठी आणला जातो. या जिल्ह्यांमध्ये खवा चांगला मिळतो. त्यामुळे येथील खवा राज्यात प्रसिद्ध आहे. तेथील खव्याला मोठी मागणी असते. तेथील शेतकऱ्याच्या घरा-घरांतून दूध आटवून हा खवा उत्पादित होतो. पाथरूड, वरवण, सरमकुंडी, कुंथलगिरी अशा खव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गावांतून आलेला खवा म्हणून हा बनावट खवा राज्याच्या वेगवेगळ्या भागांत विक्रीसाठी पाठविला जात असे.

या टिकटॉक गर्लनं लावलं जगाला वेड

-असा तयार होतो बनावट खवा
दूध पावडर वापरून, जयसिंगपूर येथे बनावट खवा तयार केला जात होता; तसेच व्हे पावडर (दुधातील प्रोटिन, फॅट पूर्ण काढून राहिलेला घटक) आणि "टी-कॉफी प्रिलिक' (मल्ट्रोडिस्ट्रीन आणि मिल्क पावडर यांचे मिश्रण) यातूनही खव्याचे उत्पादन करण्यात येत होते. प्रत्यक्षात मल्ट्रोडिस्ट्रीन हा दुधाचा घटक नाही; पण त्याचा सर्रास वापर करून, खवा तयार होत असल्याचे "एफडीए'च्या छाप्यांतून उघड झाले.

शिवभोजन थाळी चालू होणार; कोणाला चालू करण्याची परवानगी? किती मिळणार अनुदान?

- बनावट खव्याची वितरणव्यवस्था
बनावट खवा जयसिंगपूरवरून बार्शीला पाठविला जात होता. तेथून तो पाथरूड, वरवण, सरमकुंडी, कुंथलगिरी अशा नावाने पुणे, साताऱ्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागात वितरित होत असे. पुण्याचे सहायक आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त संपत देशमुख, मोहन केंबळकर, अन्नसुरक्षा अधिकारी रमाकांत महाजन, अनिल पोवार, सतीश हाके यांनी ही कारवाई केली. 

म्हणून सोरेन यांनी मानले शरद पवारांचे आभार

"एफडीए'च्या छाप्यातील जप्त माल
- मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील अर्जुन त्रैशेल पाटील यांच्या गणेश मिल्क प्रॉडक्‍टमधून 29 किलो खवा, पांढरी पावडर जप्त करण्यात आली. खव्याची किंमत तीन हजार 770 इतकी आहे. पांढरी पावडर 488 किलो इतकी आहे. एक लाख 12 हजार इतका किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

- टाकवडे येथील शिवरत्न मिल्क प्रॉडक्‍ट 70 किलो खवा, ज्याची किंमत 12,540 रुपये इतकी आहे. 14 किलो मिल्क पावडर जप्त झाली. किंमत 4 हजार 172 इतकी आहे. नऊ किलो पांढरी पावडर असा सुमारे 18 हजार 160 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. जयवंत शिंदे यांच्या टाकवडे येथील गोडाऊनमध्ये 17 लाख 83 हजार इतक्‍या किमतीची मिल्क पावडर जप्त झाली. गोडाऊनचा परवाना नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

फास्टटॅग अपडेट नाही; चालकांना भुर्दंड

बनावट खवा कसा ओळखणार?
खरेदी केलेला खवा हा खरा आहे की बनावट, हे फक्त डोळ्यांनी ओळखता येत नाही. त्यासाठी प्रयोगशाळेत हा खवा तपासावा लागतो. त्यातून ते सिद्ध होते. खव्यात फॅटचे प्रमाण कमी आहे, हे केवळ पाहून कळत नसल्याने बनावट खवा विक्रीसाठी आणला गेला.

पुण्यात 20 लाखांची उलाढाल
एकट्या पुणे शहरात दररोज सुमारे दहा टन खव्याची विक्री होते. सध्या प्रतिकिलो खव्याची किंमत 200 रुपये असल्याने शहरात खव्याची एका दिवसाची उलाढाल 20 लाख रुपयांची होत असल्याची माहिती बाजारपेठेतून मिळाली.

बनावट खवा उत्पादित करून, विक्री करणाऱ्या कोल्हापूर परिसरातील तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यातून सुमारे 18 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या खव्याचे नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.- संपत देशमुख, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com