#MilkAgitation शनिवारपासून दुधाच्या दरात तीन रुपयांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

शनिवारपासून (ता.21) दुधाच्या दरात तीन रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. याशिवाय दूध उत्पादकांना दर वाढवून मिळण्यासाठी केंद्र शासनाने दूध भुकटीसाठी 20 टक्‍के प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. त्यासोबत, दुग्धजन्य पदार्थ व दूध पावडरवर 40 टक्‍के आयात शुल्क लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर - येत्या शनिवारपासून (ता.21) दुधाच्या दरात तीन रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. याशिवाय दूध उत्पादकांना दर वाढवून मिळण्यासाठी केंद्र शासनाने दूध भुकटीसाठी 20 टक्‍के प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. त्यासोबत, दुग्धजन्य पदार्थ व दूध पावडरवर 40 टक्‍के आयात शुल्क लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दूध दर वाढवून देण्यासाठी राज्य शासनाने दूध भुकटी उत्पादकांसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान जाहीर केले आहे. तसेच मध्यान्ह भोजन, तसेच इतर शासकीय योजनांत भुकटी देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे 21 जुलैपासून 3 रुपये तर नंतर 2 रुपये वाढविण्याचे काही खाजगी, सरकारी दूध संघांनी जाहीर केले आहे.

दुसऱ्या बाजूला मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु आहे. त्याचा दूध संकलनावर मोठा परिणाम झाला असून दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यकर्ते हल्ले करत आहेत. यासंबंधाने विधिमंडळात तीन वेळा चर्चा झाली आहे. मात्र निर्णय झाला नव्हता. काही निर्णय केंद्र सरकारशी संबंधित होते. आज केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यासंबंधाने निर्णय घेण्यासाठी नागपूर अधिवेशनात आले होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात ही बैठक झाली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह विरोधी पक्षनेते उपस्थित होते. 

या बैठकीनंतर माहिती देताना गडकरी म्हणाले, दुग्धजन्य पदार्थ आणि भुकटीवर 40 टक्‍के आयातशुल्क लावण्याचा निर्णय झाला आहे. केंद्र शासन भुकटी तयार करणाऱ्यांना 20 टक्‍के प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. मध्यान्ह योजनेत दूध वितरण करण्यात येणार आहे. आदिवासींच्या योजनेतही दूध दिले जाणार आहे.

Web Title: MilkAgitation Milk prices have increased by three rs. since Saturday