Breaking : महापालिका निवडणुकीसाठी 2017 प्रमाणेच प्रभाग रचना; कॅबिनेटचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Devendra Fadnavis government

Breaking : महापालिका निवडणुकीसाठी 2017 प्रमाणेच प्रभाग रचना; कॅबिनेटचा निर्णय

मुंबई - राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेलं एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना बदलणार असल्याच निश्चित झाल्याचं सुत्रांनी सांगितलं. तसेच २०१७ मधील प्रभाग रचनेनुसारच निवडणूक घेण्यासंदर्भात कॅबिनेटमध्ये ठरल्याचं सांगण्यात आलं आहे. (Municipal corporation election news in marathi)

हेही वाचा: मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवीन सरकार आल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांकडून पूर्वीच्या प्रभाग रचनेप्रमाणेच महापालिका निवडणूक घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच २०११ मध्ये जनगणना झाली होती. त्यानंतर २०१७ ला वॉर्ड रचना झाला होती. त्यानंतर जनगणना झालीच नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने वाढवलेली वॉर्ड रचना चुकीची आहे, अशी भूमिका भाजपने आधीच घेतली होती. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर जुन्या वॉर्ड रचनेसंदर्भातील चर्चा झाली.

मुंबई महापालिकेत २२७ वॉर्ड होते. मात्र ते वाढवून २३६ करण्यात आले होते. या व्यतिरिक्त पुण्यासह अनेक महापालिकांमध्ये वॉर्ड वाढवण्यात आले होते. त्यामुळे या सर्व निवडणुका २०१७ च्या वॉर्ड रचनेनुसार होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास आरक्षणात मोठा फरक पडू शकतो. त्यामुळे आरक्षण सोडत नव्याने निघू शकतात. शिवाय निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागेल.

हेही वाचा: शिवसेना-शिंदे गटाचा वाद 'व्हॉट्सऍप लेव्हल'वर; नीलम गोऱ्हेंना ग्रुपमधून काढलं

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली प्रभाग रचना शिवसेनेला अनुकूल बनविण्यात आली होती, असा आरोप झाला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस आणि भाजपने नाराजी व्यक्त केली होती. या दोन्ही पक्षांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली होती. मात्र आता २०१७ प्रमाणेच निवडणूक घेण्याचा निर्णय झाल्यास याचा परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीवरही होऊ शकतो. कारण जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये देखील वाढ कऱण्यात आली आहे.

Web Title: Minicipal Corporation Election 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top