'पुण्यातील 1683 दुग्ध संस्था अवसायानात '

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नागपूर - पुणे जिल्ह्यात एक हजार 683 संस्था अवसायानात निघाल्या असल्या तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सहकारी दूध संस्थांच्या दूध संकलनात वाढ झाली आहे. दूध उत्पादन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी मराठवाड्यात "एनडीडीबी'च्या माध्यमातून पथदर्शी प्रकल्प जालना जिल्ह्यात राबविला जाणार आहे. त्याकरिता चार हजार गायींचे वाटप केले जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली. 

अनंत गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना खोतकर म्हणाले, ""पुणे जिल्ह्यातील सहकारी दूध व्यवसायात 2015 मध्ये एप्रिल ते ऑगस्ट या काळात एकूण 28 लाख 832 लिटर दूध संकलन केले. 2016 मध्ये एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत हे संकलन 29.252 लाख लिटरवर पोचले. 30 ऑक्‍टोबर 2016 पर्यंत 2492 प्राथिमक दुग्ध सहकारी संस्थांपैकी एक हजार 100 संस्था कार्यरत आहेत. एक हजार 361 संस्था अवसायानात व 31 सहकारी संस्था बंद आहेत. त्यापैकी सर्वेक्षणाच्या विशेष मोहिमेअंतर्गत अवसायानात निघालेल्या 322 संस्था आहेत. एकूण अवसायानात निघालेल्या संस्थांची संख्या एक हजार 683 आहे.'' 

पुण्यासह राज्यातील दुग्ध उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देण्याकरिता राज्यातील प्रत्येक गावात अथवा लहान समूहासाठी "बल्क मिल्क कुलर' उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याकरिता दुग्धविकास खात्यामार्फत सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. ज्या गावात दूध संस्था नाहीत, तेथे त्या स्थापन करण्यासाठी किंवा अवसायानातील दूध संस्था पुनरुज्जीवित करण्यासाठीदेखील विचार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Minister Arjun Khotkar