

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil
esakal
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर मंत्री भरत गोगावले यांनी पलटवार केला आहे. “एकनाथ शिंदे यांची शान लाखो लाडक्या बहिणी, मराठे आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामामुळे वाढली आहे. कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊ नये आणि ठाण्याला कोणी आव्हान देऊ नये,” असा इशारा गोगावले यांनी दिला. तसेच, “मराठे म्हणून आम्ही याचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही,” असेही त्यांनी म्हटले.