गिरीश बापट यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला : उच्च न्यायालय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

मंत्री हे जनतेचे विश्वस्त आणि रक्षक असतात. मात्र, त्यांनी कर्तव्याचे पालन करण्यात कसूर केले असून, या प्रकरणातून हे स्पष्ट दिसत आहे. गिरीश बापट यांनी पदाचा गैरवापर करुन आणि कायद्याची पायमल्ली करत अशा प्रकारचे अनेक आदेश पारित केले, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी कर्तव्यात कसूर केले, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराला परवाना बहाल केल्याप्रकरणी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

मंत्री हे जनतेचे विश्वस्त आणि रक्षक असतात. मात्र, त्यांनी कर्तव्याचे पालन करण्यात कसूर केले असून, या प्रकरणातून हे स्पष्ट दिसत आहे. गिरीश बापट यांनी पदाचा गैरवापर करुन आणि कायद्याची पायमल्ली करत अशा प्रकारचे अनेक आदेश पारित केले, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, 2016 च्या एका प्रकरणात तत्कालीन तहसीलदार आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी काही स्वस्त धान्यांच्या दुकानांची चौकशी करुन नियमांचे पालन केले नाही, असा ठपका ठेवण्यात आला होता. त्यांनी ही दुकानेही बंद केली होती. मात्र, गिरीश बापट यांनी हा निर्णय रद्द केला आणि दुकानदारांना पुन्हा संधी दिली. याबद्दल न्यायालयाने बापट यांच्यावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले.

Web Title: Minister Girish Bapat Misuse their Rights says High Court