होय, तिवरे धरणाबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले; महाजनांची कबुली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जुलै 2019

महाजन म्हणाले, की तिवरे धरण फुटल्याची घटना दुर्दैवी आहे. या ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरु आहेत. चौकशीचे आदेश आम्ही दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.

मुंबई : तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती, तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांनी दुरुस्ती केली होती असा दावा केला आहे. त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची, माहिती गिरीश महाजनांनी दिली.

चिपळूणमधील तिवरे धरणाला भगदाड पडल्यामुळे धरण फुटल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 24 जण बेपत्ता झाले असून दुर्घटनेतील सहा जणांचे मृतदेह हाती लागल्याची गिरीश महाजन यांनी माहिती दिली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर घटनास्थळी गेले आहेत.

महाजन म्हणाले, की तिवरे धरण फुटल्याची घटना दुर्दैवी आहे. या ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरु आहेत. चौकशीचे आदेश आम्ही दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.

शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिली. मागील चार-सहा महिन्यापासून स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला याची माहिती दिली होती. मात्र अधिकाऱ्यांनी काम करताना निष्काळजीपणा केला गेला. स्थानिकांनी सांगूनही दुर्लक्ष केले गेले त्यामुळे या घटनेला जबाबदार प्रशासन आहे असा आरोप त्यांनी केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister Girish Mahajan clarifies on Tiware Dam breaching