'राष्ट्रवादीत जितेंद्र आव्हाडांना कोणी विचारत नाही, ते एकाकी पडलेत'; एकेरी भाषेत उल्लेख करत मुश्रीफांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना कोणीही विचारत नाही.
Hasan Mushrif vs Jitendra Awhad
Hasan Mushrif vs Jitendra Awhadesakal
Updated on: 
Summary

‘मुश्रीफ यांना भाजपसोबत जायचे नव्हते, तसा फोन त्यांनी मला केला होता’, असा दावा आव्हाड यांनी काल केला होता.

कोल्हापूर : ‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना कोणीही विचारत नाही. ते एकाकी पडल्याने काहीही बोलत आहेत, त्यांची बुद्धी ठिकाणावर नाही’, अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला. आव्हाड यांच्यावर एकेरी शब्दात टीका करून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Hasan Mushrif vs Jitendra Awhad
घरी निघालेल्या पालकमंत्र्यांच्या गाडीवर भिरकावली बाटली; पोवई नाक्यावर 100 पोलिस झाले गोळा, काय होतं बाटलीत?

‘मुश्रीफ यांना भाजपसोबत जायचे नव्हते, तसा फोन त्यांनी मला केला होता’, असा दावा आव्हाड यांनी काल केला होता. यावर मुश्रीफ यांची प्रतिक्रिया विचारल्यावर ते बोलत होते.

Hasan Mushrif vs Jitendra Awhad
शाहू मैदानावर फुटबॉल सामन्यात हुल्लडबाजी! समर्थकांनी फेकल्या माव्याच्या थुंकीने भरलेल्या बाटल्या, दगड; पोलिसांचा लाठीमार

मुश्रीफ म्हणाले,‘आव्हाड यांना पक्षात कोणी विचारत नाही. त्यामुळे ते एकाकी पडले आहेत. पहिल्यांदा आमची सत्ता गेली तेव्हा भारतीय जनता पार्टी व शिंदे गटासोबत आपण जावे यासाठी आव्हाड यांनीच पुढाकार घेतला होता. त्यावेळी आमदारांनी सह्या केल्या त्यावर आव्हाड यांची सही एक नंबरला आहे. पण आता आम्ही भाजपसोबत जायचे ठरवले, त्यावेळच्या चर्चेत आव्हाड नव्हतेच. माझा भाजपसोबत जायच्या निर्णयाला विरोध असता तर मी मंत्रीपदाची शपथ घेतली असती का?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Hasan Mushrif Satej Patil Gokul election Kolhapur
Satej Patil on Hasan Mushrif Gokul Election
Hasan Mushrif panel announcement October 8
Gokul Election 2026 Latest Update
Marathi News Esakal
www.esakal.com