esakal | ऐनवेळी ठरलेल्या बैठकीसाठी पंढरपुरात "हे मंत्री' अवतरले चक्क हेलिकॉप्टरने! म्हणाले, आमच्या सरकारला धोका नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

Helicoptor

सध्या अनेक राज्यांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आज राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणावर राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. परंतु जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्यामुळे मंत्री पाटील यांच्या खासगी हेलिकॉप्टरला उतरण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर तातडीने ते हेलिकॉप्टरने पंढरपुरात दाखल होऊन पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. 

ऐनवेळी ठरलेल्या बैठकीसाठी पंढरपुरात "हे मंत्री' अवतरले चक्क हेलिकॉप्टरने! म्हणाले, आमच्या सरकारला धोका नाही!

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : राजस्थान आणि मध्य प्रदेशात राजकीय खलबते सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पंढरपुरात पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेतली. ऐनवेळी ठरलेल्या बैठकीला जयंत पाटील चक्क हेलिकॉप्टरने अवतले. पंढरपुरात अचानक घेतलेल्या बैठकीचा तपशील मात्र समजू शकला नाही. 

हेही वाचा : डॉक्‍टरांना झाली कन्यारत्नाची प्राप्ती; त्यांच्याच स्टाईलने केले तिचे असे स्वागत... 

दरम्यान, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. आमच्या तिन्ही पक्षांची ताकद मोठी आहे. आमच्या एका जरी आमदाराने राजीनामा दिला तर परत निवडून येण्याची त्याची ताकद नाही. आम्ही तिन्ही पक्ष एक संघटन असल्यामुळे आमच्या सरकारला धोका नसल्याचे जयंत पाटील या वेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

हेही वाचा : पंढरपुरातील महापूर चाळ परिसरात आढळले आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; केला परिसर सील 

सध्या अनेक राज्यांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आज राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणावर राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. परंतु जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्यामुळे मंत्री पाटील यांच्या खासगी हेलिकॉप्टरला उतरण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर तातडीने ते हेलिकॉप्टरने पंढरपुरात दाखल होऊन पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. बैठकीस जिल्हा कार्याध्यक्ष बळिराम साठे, प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे, आमदार भारत भालके, बबन शिंदे, यशवंत माने, युवक शहराध्यक्ष संदीप मांडवे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील आदी उपस्थित होते. 

पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर उजनी पाणी वाटप आणि नियोजना संदर्भातही अधिकारी आणि आमदारांशी चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंगेस आणि शिवसेना युती भक्कम आहे. चंद्रकात पाटील यांचे आव्हान आम्ही कधीही स्वीकारण्यास तयार आहोत. त्यांनी निवडणुकीसाठी तयार राहावे, असा पलटवार मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केला. राजू शेट्टी यांच्या वीज बिल आंदोलनाविषयी विचारले असता, सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. शासन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल, असे ही मंत्री पाटील यांनी सांगितले. 

हेलिकॉप्टरविषयी विचारले असता, हेलिकॉप्टर हे दुसरीकडे चालले होते. मध्येच लिफ्ट मिळाले म्हणून हेलिकॉप्टरने पंढरपुरात आलो, असे मिस्किल उत्तर त्यांनी दिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

महाराष्ट्र