esakal | केंद्रीय मंत्री गडकरी सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभे असतात तेव्हा..! Video व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

nitin gadkari

मंत्री गडकरी सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभे असतात तेव्हा..

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मंत्री म्हटलं की.. आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे VIP व्यक्ती...त्यांच्या अवतीभवती असलेला सुरक्षारक्षक किंवा पोलीसांचा लवाजमा...आदी.. मंत्र्यांना त्यांच्या पदानुसार स्पेशल प्रोटेक्शन युनिटद्वारे (एसपीयू) एक्स, वाय, झेड आणि झेड प्लस अशा चढत्या श्रेणीनुसार पोलिस संरक्षण दिले जाते. तसेच एखादा प्रवास करायचा असेल तर त्यांना व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते. तसेच वेगळ्या मार्गाने प्रवेश दिला जातो. पण इथे जेव्हा खुद्द केंद्रीय मंत्री एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे विमान प्रवास करण्यासाठी चक्क रांगेत उभे राहतात. तेव्हा खरंच त्या मंत्र्याचा साधेपणा कौतुकास्पद वाटतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा (Nitin Gadkari Viral Video) एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय...

गडकरींचा व्हिडिओ व्हायरल...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये विमानातून प्रवास करण्यासाठी ते सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभे राहिले होते. विमानात बसलेल्या एका प्रवाश्याने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये टिपला आहे. त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. एवढी मोठी सुरक्षा असलेले मंत्री जेव्हा सामान्य माणसांप्रमाणे रांगेत राहताना दिसतात. तेव्हा तिथल्या प्रवाश्यांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहवत नाही.

हेही वाचा: समीर वानखेडेंवर पोलिसांचा वॉच नाहीय - गृहमंत्री

सायरनचा तो आवाज नको...

ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी भारतातील सर्व गाड्यांचे कर्णकर्कश हॉर्न बदलून वाद्यांचे मधूर आवाज असलेले हॉर्न लवकरच लावण्यात येणार आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काही दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर आता अ‍ॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज (Ambulance siren sound) बदलण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. लवकरच या संदर्भात आदेश काढण्यात येणार असल्याचं गडकरींनी एका कार्यक्रमात म्हटलं होत.

हेही वाचा: लहान मुलांसाठी आपत्कालीन वापराला 'कोव्हॅक्सिन'ला मंजुरी

loading image
go to top