Ramdas Athawale : रामदास आठवलेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; आठवले सुखरुप

Ramdas Athawale News : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये आठवले यांना कुठलीही दाखपत झालेली नाही. त्यांच्या ताफ्यातील काही गाड्यांचं नुकसान झालं आहे.
Ramdas Athawale accident news
Ramdas Athawale accident newsesakal

Ramdas Athawale News : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये आठवले यांना कुठलीही दाखपत झालेली नाही. त्यांच्या ताफ्यातील काही गाड्यांचं नुकसान झालं आहे.

खंबाटकी घाटामधील बोगद्यात एका पीकअप गाडीचा टायर फुटल्याने कंटेनर थांबला होता. मात्र पाठीमागून येणाऱ्या काही गाड्यात त्या कंटेनरला धडकल्या.

Ramdas Athawale accident news
Electoral Bonds : निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बॉण्डच्या नंबर्ससह सर्व माहिती जाहीर; वाचा कोणाला कोणी दिला निधी?

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्यातील गाड्या बोगद्यातील कंटेनरला धडकल्या. त्यामुळे तीन ते चार गाड्यांचं नुकसान झालं आहे. अपघातामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही.

Ramdas Athawale accident news
Uddhav Thackeray : ''पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं देशद्रोह'', मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले...

ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकून हा अपघात झाला. रामदास आठवले यांच्या गाडीचं नुकसान झालेलं आहे. ताफ्यातील एका पोलिस गाडीचंही नुकसान झालंय. शिवाय एका स्कॉर्पिओ गाडीचं नुकसान झालेलं आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com