मंत्रिपदाच्या शपथेनंतर संजय राठोडांचे मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay rathod

मंत्रिपदाच्या शपथेनंतर संजय राठोडांचे मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन

यवतमाळ : शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात पोहोचले असून नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले असून त्यांनी यवतमाळमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. यावेळी त्यांनी त्यांच्यावरील आरोपावरून टीका करणाऱ्यांना चांगलंच फटकारलं आहे.

(Sanjay Rathod Rally in Yavatmal)

नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राठोड पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात पोहोचले असून ते नागपूरातील विमानतळावर पोहोचताच त्यांचे शिवसैनिकांकडून जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर ते पहिल्यांदा पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

हेही वाचा: तुमचा विजय देशासाठी प्रेरणादायी; राष्ट्रकुलमधील विजेत्यांशी पंतप्रधानांचा संवाद

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप होते त्यानंतरही त्यांना मंत्रिपद मिळाल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, "माझ्यावर आरोप होते. त्यावर पोलिसांनी चौकशी केली असून त्याबाबत कोर्टाचा निकाल आला आहे आणि मला क्लीनचीट मिळाली आहे. यानंतर आता यासंदर्भात माझ्यावर कुणी टीका केली किंवा आरोप केले तर त्याला मी कायदेशीर उत्तर देणार आहे." असं संजय राठोड म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंबद्दल जे ट्वीट संजय शिरसाठ यांच्याकडून पडलं होतं, ते चुकून पडलं असल्याचं स्पष्टीकरण देत उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला आदर आहे असं संजय राठोड म्हणाले आहेत. खातेवाटप आणि जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदी निवड लवकरच करण्यात येणार आहे, त्याचबरोबर कुणाला कोणतं मंत्रिपद दिलं जाणार ते मुख्यमंत्री ठरवतील असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: औरंगाबादमधील पाचही बंडखोरांना आमदारांना आडवं करू; खैरेंचा इशारा

आपल्या मतदारसंघात आल्यावर पहिल्यांदा पोहरादेवीचे दर्शन घेणार असून नंतर जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर नुकसानीचा आकडा आल्यानंतर लगेच शेतकऱ्यांना मदत केली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Web Title: Minister Sanjay Rathod Yavatmal Shivsena Fist Time Rally

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..