साताऱ्यातून मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नेत्याकडून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai

निवडणुकीत पाटण सोसायटी मतदारसंघाची लढत लक्षणीय झाली.

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव

पाटण : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पाटण सोसायटी मतदारसंघाची लढत लक्षणीय झाली. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई विरुद्ध युवानेते सत्यजितसिंह पाटणकर या प्रतिष्ठेच्या लढतीत अपेक्षेप्रमाणे सत्यजितसिंह पाटणकर यांनी बाजी मारली व मंत्री देसाई यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

१०३ मतदार असणाऱ्या सोसायटी मतदार संघात एक मतदार मयत असून मतदानादिवशी १०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ५७ मतदार पाटणकरांचे, तीन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तर ४२ देसाईंचे असे मतदारांचे बलाबल होते. त्यापैकी सत्यजितसिंह पाटणकरांना निवडणुकीत 58 मते, तर मंत्री शंभूराज देसाई यांना 44 मते मिळाली. या निवडणुकीत ग्रामीण गृहराज्यमंत्री मंत्री देसाई यांना पराभवास सामोरे जावे लागले.

हेही वाचा: भाजपच्या साथीनं NCP सहकारमंत्र्यांकडून 'काँग्रेस'चा करेक्ट कार्यक्रम

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रत्येक गोष्टीत सत्यजितसिंह पाटणकर यांनी जातीने लक्ष घातल्याने व नियोजन पद्धतीने मतदारांना खबरदारीचा उपाय म्हणून टूरवर नेल्याने गृहराज्यमंत्र्यांच्या विरोधातील विजय सोपा झाला. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करुन विजय साजरा केला. गृहराज्यमंत्र्याच्या विरोधातील या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

हेही वाचा: धक्कादायक! शरद पवारांच्या निष्ठावंत आमदाराचा एका मताने पराभव

सत्यजितसिंह पाटणकर 58 मते मिळवून विजयी

एकूण मते -            103        

झालेली मते -          102

उमेदवार                    मिळालेली मते

शंभूराज देसाई                    44

सत्यजितसिंह पाटणकर      58

विजयी उमेदवार - सत्यजितसिंह

मतांचे लीड - 7

loading image
go to top