'त्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही'; सुषमा अंधारें‍विरोधात शंभूराज देसाई आक्रमक, पाटण न्यायालयात दाखल केली तक्रार

मंत्री देसाई यांनी शुक्रवारी पाटण न्यायालयात (Patan Court) खासगी तक्रार दाखल केली आहे.
Shambhuraj Desai vs Sushma Andhare
Shambhuraj Desai vs Sushma Andhareesakal
Summary

सुषमा अंधारे यांनी जाणीवपूर्वक केलेली वक्तव्ये ही निव्वळ मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा व प्रतिमा मलिन करण्यासाठी केली होती.

मोरगिरी : पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याविरोधात पाटण न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंत्री देसाई यांनी शुक्रवारी पाटण न्यायालयात (Patan Court) खासगी तक्रार दाखल केली आहे.

Shambhuraj Desai vs Sushma Andhare
Kunbi Certificate : वाळवा, शिराळ्यात सर्वाधिक कुणबी नोंदी; दुष्काळी तालुक्यांत नोंदीच नाहीत, शासनाला करणार अहवाल सादर

सुषमा अंधारे यांनी १८ ऑक्टोबर २०२३ रोजी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाच्या (Lalit Patil Drug Case) अनुषंगाने उत्पादन शुल्कमंत्री देसाई यांच्यावर आरोप केले होते. मात्र, त्यानंतर तातडीने या प्रकरणाशी आपला दुरान्वयानेही संबंध नसल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले होते.

Shambhuraj Desai vs Sushma Andhare
Karnataka Politics : कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळणार? मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, पाच वर्षे मीच..

मंत्री‌ देसाई यांचा, तसेच त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्री म्हणून असणाऱ्या खात्याचा ड्रग्जमाफिया आरोपी ललित पाटील याच्याशी कसलाही संबंध येत नव्हता व नाही. असे असतानाही सुषमा अंधारे यांनी जाणीवपूर्वक केलेली वक्तव्ये ही निव्वळ मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा व प्रतिमा मलिन करण्यासाठी केली होती. त्यामुळे शुक्रवारी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीद्वारे सुषमा अंधारे यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com