Som Prakash : 'कॉंग्रेस संपण्याच्या मार्गावर, प्रादेशिक पक्षही जास्त काळ टिकतील असं वाटत नाही'

'भाजप ताकदवान पक्ष आहे. अन्य पक्ष कमजोर होत आहेत.'
Minister Som Prakash
Minister Som Prakashesakal
Summary

'भाजप ताकदवान पक्ष आहे. अन्य पक्ष कमजोर होत आहेत.'

कऱ्हाड (सातारा) : विरोधक तगडा हवा हे खरं असलं तरी कॉंग्रेस (Congress) मात्र अंतर्गत बंडाळीमुळं संपण्याच्या मार्गावर आहे. तर, प्रादेशिक पक्षही जास्त काळ टिकतील असं वाटत नाही, अशी टीका वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश (Som Prakash) यांनी पत्रकार परिषेदत केली. सातारा लोकसभा मतदार संघात भाजपची (BJP) संपर्क मोहीम सुरू आहे. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore), सातारा लोकसभेचे प्रभारी अतुल भोसले, सरचिटणीस विक्रम पावसकर आदी उपस्थित होते. काँग्रेस पक्ष संपत चालला आहे, अशी टीका करताना मंत्री सोम प्रकाश यांनी भक्कम विरोधक हवा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. 'भाजप पक्ष ताकदवान पक्ष आहे. अन्य पक्ष कमजोर होत आहेत. त्यात प्रादेशिक पक्षांची संख्या जास्त आहे. कॉंग्रेस अंतर्गत बंडाळीमुळं संपण्याच्या मार्गावर आहे. भक्कम विरोधक हवा, मात्र ती जागा कॉंग्रेस दुर्देवानं घेवू शकत नाही.'

Minister Som Prakash
Sharad Pawar : आगामी लोकसभेपर्यंत शरद पवारांचा प्रभाव कमी होणार; केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान

प्रकाश पुढं म्हणाले, 2024 ची निवडणूक निर्णायक होणार आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व नेत्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सातारा लोकसभा (Satara Lok Sabha Constituency) शिवसेनाचा आहे, तरीही भाजप इथं प्रयत्न करत आहे. या प्रश्नावर मंत्री प्रकाश म्हणाले, आम्ही या मतदार संघावर दावा करत नाही. इथं पक्ष भक्कम करण्यासाठीचं आमचे प्रयत्न सुरू आहेत. पक्ष भक्कम होणं गरजेचं आहे. निवडणुका लागतील, युती होईल, त्यावेळची वेगळी गोष्ट आहे. ते निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेतील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Minister Som Prakash
Manipur : बिहारपाठोपाठ मणिपूरमध्येही भाजपला मोठा धक्का; आमदार काढून घेणार पाठिंबा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com