मोठी बातमी! राज्यातील आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरू करण्याबाबतमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली महत्वपुर्ण माहिती; वाचा

प्रशांत कांबळे
Sunday, 16 August 2020

 मिशन बिगीन अंतर्गत राज्यात आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरू करणार असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

मुंबई  :  मिशन बिगीन अंतर्गत राज्यात आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरू करणार असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून एसटी सेवा सुरू करण्यात येणार आहे. पुढच्या आठवड्यात सेवा सुरु होईल अशे संकेतही वडेट्टीवार यांनी दिले.  यापुर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  केवळ अत्यावश्यक सेवा आणि जिल्हाअंतर्गत एसटी सेवा सुरु होत्या.

मध्य रेल्वेने उघडली जोरदार मोहिम; 'या' पाचही विभागात राबवण्यात येणार विशेष अभियान

मात्र एसटी सेवा सुरु झाल्यातरी एका एसटी बसमध्ये 20 पेक्षा अधिक प्रवाशांना प्रवास करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मिशन बिगीन अंतर्गत अनेक सेवा, उद्योग, व्यवसाय सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. एसटी शिवाय कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्याचे संकेतही वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

कोकण किनारपट्टी पर्यटनाच्या विकासाने बहरणार; स्थानिकांची होणार बेरोजगारीतून मुक्तता

कोरोनाच्या काळातही एसटीने जिल्हाअंतर्गत 50 टक्के बस सेवा सुरु केली होती. मात्र, प्रवाशांनी या सेवेला पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे प्रवासी उत्पन्नापेक्षा डिझेलचा खर्च जास्त झाल्याचे चित्र आहे. मात्र एसटी सेवा ठप्प असल्यामुळे वाढता तोटा बघता आता सेवा सुरु करणे आवश्यक असल्याचे मत अनेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. मिशन बिगीन अंतर्गत इतर सर्व सेवा हळूहळू सुरु असतांना, सर्वसामान्यांच्या वाहतूकीसाठी एसटी सेवेची आवश्यकता वाढणार आहे.

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Vijay Vadettiwar gave important information about starting inter-district ST bus service in the state; Read on