21 महिन्यांनी अखेर मिरज-कुर्डूवाडी, कोल्हापूर-सातारा पॅसेंजर सुरू : Railway | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway

21 महिन्यांनी अखेर मिरज-कुर्डूवाडी, कोल्हापूर- सातारा पॅसेंजर सुरू

मिरज (सांगली) : सर्वसामान्य प्रवाशांसह विद्यार्थी नोकरदार वर्गाची जीवन वाहिनी संबोधली जाणारी कोल्हापूर-सातारा (Kolhapur-Satara-Railway) पॅसेंजर मंगळवारपासून धावणार आहे. तर विठुरायाच्या कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर अर्थात सोमवारपासून मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर (Miraj-Kurduwadi Passenger)सेवा सुरू होणार आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल 21 महिने बंद असलेली पॅसेंजर रेल्वेगाडी सुरु झाल्यामुळे प्रवाशांची आर्थिक बचत होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने पॅसेंजर सेवा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय प्रवाशांना दिलासा देणार आहे. तसेच लवकरच कोविड स्पेशल म्हणून धावणार्‍या एक्सप्रेस गाड्या पूर्वीच्या वेळापत्रकानुसार सुटणार असल्याचे संकेत रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

हेही वाचा: चांदी 2700 रुपयांनी महाग तर सोन्याचा दरही उसळला

सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा आलेख कमी होत आहे. शिवाय मुंबईत सुरू केलेल्या लोकल सेवेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पॅसेंजर सेवा सुरू करण्याची मागणी अनेक संघटनांकडून होत होती. या मागणीचे रेल्वे प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेत पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथील पॅसेंजर सेवा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मिरज-कुर्डूवाडी आणि सातारा-कोल्हापूर पॅसेंजर सेवा सुरू केली आहे. ही गाडी पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे धावेल. शिवाय स्थानकांच्या थांब्यात कोणताही बदल करण्यात आला नाही.

मिरज-कुर्डूवाडी गाडी सोमवार (ता. 15) रोजी मिरजेतून सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी सुटेल तर कुर्डूवाडी येथे दहा वाजून 15 मिनिटांनी पोहोचेल तर कोल्हापूर-सातारा गाडी मंगळवार ता. 16 रोजी कोल्हापुरातून सायंकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी सुटून, सातारा येथे रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल. नागरिकांनी कोरोना नियमानुसार प्रवास करण्याचे आव्हान रेल्वेकडून करण्यात आले.

loading image
go to top