esakal | असा असेल महाराष्ट्रातील ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आलेला लॉकडाऊन
sakal

बोलून बातमी शोधा

असा असेल महाराष्ट्रातील ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आलेला लॉकडाऊन

महाराष्ट्रात 'मिशन बिगिन अगेन'चा दुसरा टप्पा सुरू झालाय. या दुसऱ्या टप्प्यात ३१ जुलै पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. महाराष्ट्रात सध्या ज्या पद्धतीने लॉकडाऊनचे नियम लागू आहेत त्याच पद्धतीने याही लॉकडाऊनमध्ये नियम लागू असतील.

असा असेल महाराष्ट्रातील ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आलेला लॉकडाऊन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रात 'मिशन बिगिन अगेन'चा दुसरा टप्पा सुरू झालाय. या दुसऱ्या टप्प्यात ३१ जुलै पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. महाराष्ट्रात सध्या ज्या पद्धतीने लॉकडाऊनचे नियम लागू आहेत त्याच पद्धतीने याही लॉकडाऊनमध्ये नियम लागू असतील.  ३१ जुलै २०२० रात्री १२ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे.   

मुंबईतील MMR भागात अत्यावश्यक सेवेसाठी संचार करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. सोबतच सामान्य नागरिकांना ST मधून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येणार नाही. महाराष्ट्रातील शहरांमधील रुग्णसंख्या पाहून स्थानिक प्रशासनाला याबाबत सर्वाधिकार दिलेले आहेत. त्यामुळे कंटेंमेंट झोन पाहून, हॉटस्पॉट पाहून त्या त्या भागातील तिथल्या भागाबाबत प्रशासनाकडून निर्णय घेतले जाणार आहेत. 

मोठी बातमीमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना सैफी हॉस्पिटलमध्ये केलं ऍडमिट, कारण आहे
 

कसा असेल ३१ जुलैपर्यंतचा लॉकडाऊन : 

 • कंटेनमेंट झोन बाहेरील दुकानं पूर्वीच्या नियमांनुसार सुरु राहणार 
 • मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स बंदच राहणार
 •  पूर्वीच्याच नियमाप्रमाणे बाजारपेठा ९ ते ५ या वेळेत सुरु राहणार 
 • ऑनलाईन खरेदी विक्री सुरु राहील 
 • बांधकाम क्षेत्र आधीच्या नियमानुसार सुरु राहणार
 • या पूर्वी जे लॉकडाऊनचे नियम घालून दिलेत ते नियम तसेच राहणार आहेत
 • सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडावर मास्क लावणं गरजेचं असणार आहे.
 • सोबतच एकमेकांमध्ये ६ फुटांचं अंतर ठेवणं अनिवार्य असणार आहे. 
 • मोठ्या कार्यक्रमांना याही लॉकडाऊनमध्ये बंदी असणार आहे.
 • लग्न सोहळे अंत्यविधीसाठी ५० पेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र जमू नये 
 • सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान करण्यास बंदी असेल. सोबतच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडाची कारवाई केली जाईल. 
 • हॉटेल्स बंदच राहणार, केवळ होम डिलेव्हरी सुरु राहणार 
 • सरकारने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे सलून्स आणि ब्युटी पार्लर सुरु राहतील 

मोठी बातमी -अलार्म वाजवायचा नाही म्हणून धमकावलं, हॉस्पिटलमधील इंटर्न डॉक्टरसोबत केला लंपटपणा आणि...

ठाण्यात २ तारखेपासून पूर्ण लॉकडाऊन  : 

मुंबई MMR भागातील ठाणे महानगर पालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व भागांमध्ये २ जुलै पासून पूर्वीसारखा कडकडीत लॉकडाऊन लागू होणार आहे. ठाण्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येतायत. लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिल्यानंतर ठाण्यात कोरोना रुग्णवाढीचं प्रमाण वाढलंय. याच पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी ट्विट करत याबाबत माहिती दिलीये. याबाबत अधिकृत नोटिफिकेशन देखील काढण्यात येणार आहे. गेले काही दिवस ठाण्यात सातत्याने ३०० च्या वर कोरोना रुग्ण आढळून येतायत. सोबतच नव्या हॉट स्पॉटमध्ये वाढ झाल्याने आता २ तारखेपासून पुढे दहा दिवस ठाण्यात कडकडीत लॉकडाऊन असणार आहे  

mission begin again second phase lockdown in maharashtra till 31st july