अलार्म वाजवायचा नाही म्हणून धमकावलं, हॉस्पिटलमधील इंटर्न डॉक्टरसोबत केला लंपटपणा आणि...

अलार्म वाजवायचा नाही म्हणून धमकावलं, हॉस्पिटलमधील इंटर्न डॉक्टरसोबत केला लंपटपणा आणि...

मुंबई- जे.जे रुग्णालयात महिला डॉक्टरची छेडछाड काढणाऱ्या आरोपी वॉर्डबॉयला अटक करण्यात आली आहे. सरकारी रुग्णालयाच्या आवारात प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली एका 45 वर्षीय वॉर्ड मुलाला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय शिकाऊ महिला डॉक्टर नाईट शिफ्टमध्ये काम करत होती. गुरुवारी आणि शुक्रवारी डॉक्टर वॉर्डच्या दिशेनं जात होती. त्यावेळी त्यावेळी 45 वर्षीय वॉर्डबॉय मागून आला आणि त्याने या डॉक्टरला पकडून, तिची छेडछाड केली. 

जे जे मार्ग पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या घटनेनं घाबरलेल्या डॉक्टरने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. इतकंच काय तर आरोपीनं तिला अलार्म न वाजवण्याची धमकीही दिली. यानंतर महिला डॉक्टरांनी वरिष्ठांना कळवल्यानंतर, वरिष्ठांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून आरोपीवर कायदेशीर कारवाई केली.

पोलिसांनी सांगितलं की, महिला डॉक्टरांनं घडलेला सर्व प्रकार तिच्या वरिष्ठांना सांगितला. त्यानंतर रुग्णालयाच्या डीनला कळविण्यात आले. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला बोलावले, त्यानंतर एक पथक घटनास्थळी पाठविण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

याप्रकरणी जे जे मार्ग पोलीस स्टेशनमध्ये वॉर्ड बॉयविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वॉर्डबॉयला पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टरच्या तक्रारीच्या आधारावर भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (एखाद्या महिलेच्या विनम्रतेचा आक्रोश करणे), 354 (डी) (पाठलाग करमं) आणि 506 (धमकी देणं) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गजेंद्र गोसावी असं आरोपीचं नाव असून त्याला शुक्रवारी अटक करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली. महत्त्वाचं म्हणजे या आरोपीविरोधात यापूर्वीही गुन्हा दाखल आहे. यापूर्वी एका मारहाण प्रकरणात त्याच्यावर गुन्हा आहे. त्यानंतर आता याच वॉर्डबॉयविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल झाला आहे. अटकेत असलेल्या या वॉर्डबॉयविरोधात पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

सहाय्य्क पोलिस आयुक्त अविनाश धर्माधिकारी (डोंगरी विभाग) म्हणाले, आम्हाला डॉक्टरांकडून वॉर्डबॉयनं छेडछाड केल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात करुन आरोपीला अटक करण्यात आली.

case of misconduct with lady intern doctor at J J hospital ward boy under arrest

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com