मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना सैफी हॉस्पिटलमध्ये केलं ऍडमिट, कारण आहे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना सारखा ताप येत असल्याने त्यांना मुंबईतील सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

मुंबई - मुंबईतून एक मोठी बातमी समोर येतेय. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना सारखा ताप येत असल्याने त्यांना मुंबईतील सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांची कोविड टेस्ट देखील करण्यात येणार आहे.

मुंबईत कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. मुंबईतल्या कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत किशोरी पेडणेकर या सक्रिय कोविड योद्ध्याप्रमाणे राबत असल्याचं पाहायला मिळालंय. अशातच आता किशोरी पेडणेकर यांना काही दिवसापासून सातत्याने ताप येत असल्याने त्यांना मुंबईतील सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार किशोरी पेडणेकर यांना किडणीचा देखील त्रास आहे. यावरच सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर येतेय. 

BIG NEWS - अलार्म वाजवायचा नाही म्हणून धमकावलं, हॉस्पिटलमधील इंटर्न डॉक्टरसोबत केला लंपटपणा आणि...

सध्याची मुंबईतील कोरोनाची परिस्थिती पाहता आणि किशोरी पेडणेकर यांचा मदत कामात सक्रिय सहभाग पाहता डॉक्टर्सनी कोरोना रिपोर्ट्स काढण्याचा सल्ला त्यांना दिलाय. काही दिवसांपूर्वी आपण किशोरी पेडणेकर यांना नर्सच्या भूमिकेत देखील पाहिलं होतं. अशात आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना सातत्याने ताप येत असल्याने आता सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

BIG NEWS -  तीन दिवसात पीपीई किटची रक्कम लावली 'इतकी', ऐकून बसेल धक्का!

काही दिवस शिवसेना भवन शिवसैनिकांसाठी बंद : 

मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनामध्येही कोरोनानं शिरकाव केला आहे. शिवाजी पार्क परिसरात शिवसेनेचं मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनात कोरोनाचा संसर्ग झाला. शिवसेना भवनात हे तिन्ही कर्मचारी काम करत आहेत. या तिघांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या तिन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही क्वांरटाईन करण्यात आलं आहे. या तिन्ही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच संपूर्ण सेना भवनाचे निजंर्तुकीकरण करण्यात आलं. 

mumbai mayor kishori pednekar admitted in saifi hospital due to constant fever 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai mayor kishori pednekar admitted in saifi hospital due to constant fever