भाजपात अपमान होत असेल, तर पक्षाला लाथ मारून राष्ट्रवादीत या; NCP आमदाराची पंकजा मुंडेंना खुली ऑफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amol Mitkari Pankaja Munde

'शरद पवार साहेबांचा उत्तर प्रदेशातही किती दरारा आहे, हे मनसेच्या नेत्यांनी ओळखून घ्यावं.'

'भाजपात अपमान होत असेल, तर पक्षाला लाथ मारून राष्ट्रवादीत या'

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय. त्यातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची खुली आॅफर दिलीय. भाजपमध्ये (BJP) ओबीसींचा (OBC) अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसावं की रडावं, असा प्रश्न मला पडला. पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) ही कालच्या मोर्चात स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळं पंकजा मुंडे यांचा पक्षात अपमान होत असेल तर अशा पक्षाला लाथ मारून त्यांनी आमच्या पक्षात यावं. त्यांच्यासाठी राष्ट्रवादीची दार खुली आहेत, अशी खुली आॅफर आमदार मिटकरींनी पंकजा मुंडेंना दिलीय.

हेही वाचा: 'आप'ला मोठा झटका; मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेल्या उमेदवाराचा भाजपात प्रवेश

मुंबईत नेत्र चिकित्सक तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात धनंजय मुंडे (Dhananjay Munde), आदित्य ठाकरे, आमित देशमुख यांच्यात लेन्सची चर्चा चांगलीच रंगली होती. या कार्यक्रमाला उपस्थितीत असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या डोक्यात भावाच्या मायेनी धनंजय यांनी मारलेली टपली हा देखील राज्यात चर्चेचा विषय झाला होता. त्यावेळी आपल्या भाषणात धनंजय मुंडेंनी आदित्य ठाकरेंचा दाखला देत पंकजा यांनी महाविकास आघाडीच्या लेन्समधून पाहिलं पाहिजे, असे म्हणत त्यांना राष्ट्रवादीत येण्याची आॅफर दिली होती.

हेही वाचा: राजकीय घडामोडींना वेग; शिवसेना नेते संजय राऊत 28 मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर

दरम्यान, आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील तशीच आॅफर पंकजा मुंडे यांना दिल्यामुळं राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. प्रसार माध्यमांशी बोलतांना मिटकरी यांनी मनसेकडून शरद पवार, सुप्रिया सुळे यांचा अयोध्येतील भाजपचे खासदार ब्रिजभूषण यांच्यासोबतचा फोटा व्हायरल केला जात आहे. ३५ वर्ष संसदीय कामाचा अनुभव असलेल्या ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येयत येण्यापासून रोखले. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला. यावर यामागे शरद पवारांचा हात आहे, असा आरोप जर मनसे करत असेल तर मला माझ्या नेत्याचा अभिमान आहे. यावरून शरद पवार (Sharad Pawar) साहेबांचा उत्तर प्रदेशातही किती दरारा आहे, हे मनसेच्या नेत्यांनी ओळखून घ्यावे, असा चिमटा देखील मिटकरी यांनी काढलाय.

Web Title: Mla Amol Mitkari Open Offer At Pankaja Munde To Join Ncp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top