...तर राज्यपालांच्या घरात घुसू : बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

मुंबई : सरकार स्थापन झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे. असे नाही झाले तर आम्ही राज्यपालांच्या निवासस्थानी मोर्चा काढू. सरकार स्थापन कधीही करा, असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

राज्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा मदतीसाठी टाहो फोडण्यात येत असताना राज्यात काळजीवाहू सरकार आहे. सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचलेली नाही. त्यामुळे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारला इशारा दिला आहे. बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला असून, ते बैठकीला उपस्थित होते.

बच्चू कडू म्हणाले, की सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने एवढं ताणून धरण्याची गरज नव्हती. जे ठरलं आहे ते द्यायला हवे होते. शेतकऱ्यांना मदत जाहीर केली पाहिजे.  दोन दिवसांत शेतकऱ्यांना मदत करा. राज्यपालांनी पुढाकार घेऊन अनुदान दिले पाहिजे. अन्यथा त्यांच्या निवासस्थानी मोर्चा काढू.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mla bacchu kadu criticised government on farmers issue