आमदार बच्चू कडू यांची चार विधानसभांसाठी चाचपणी

नवनाथ येवले 
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

लोकसभेच्या सार्वात्रिक निकवडणूका नंतर विधानसभेच्या निवडणूकील अजून बऱ्याच महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी विविध पक्षांकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी हातचा राखून विधानसभेची चाचपणी सुरू केली आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील चार विधानसभेत चाचपणी सुरू केली आहे. माळाकोळी (ता. लोहा) येथे शनिवार (ता. 03) झटका आंदोलनास मार्गदर्शन करताना सरकारवर चौफेर टिका केली.

नांदेड : लोकसभेच्या सार्वात्रिक निकवडणूका नंतर विधानसभेच्या निवडणूकील अजून बऱ्याच महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी विविध पक्षांकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी हातचा राखून विधानसभेची चाचपणी सुरू केली आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील चार विधानसभेत चाचपणी सुरू केली आहे. माळाकोळी (ता. लोहा) येथे शनिवार (ता. 03) झटका आंदोलनास मार्गदर्शन करताना सरकारवर चौफेर टिका केली.

दिव्यांगाच्या हक्कासाठी अागळे वेगळे आंदोलन, शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आसुड यात्रा, सामान्यांच्या प्रश्‍नावर मंत्रालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यापासून विधानसभेत पोटतिडकीने शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या आमदार बच्चू कडू या नेतृत्वाला आगामी निवडणूकांत प्रस्थापित राजकारण्यांना सामोरे जावे लागणार आहे.

खोट्या अश्‍वासनाच्या लाटेवर स्वार होवून सत्तेवर आलेल्या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. शेती विषयक धाेरणांसह विकासात्मक मुद्यावर आमदार कडू प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात संपर्क वाढवला आहे. 2019 च्या लोकसभेला तब्बल चार ते पाच महिण्याचा आवधी असताना कडू यांनी जिल्ह्यात विधानसभांची चाचपणी सुरू केली आहे. माळाकोळी (ता.लोहा) येथील झटका आंदोलनाच्या भेटीतून आमदार कडू यांनी पहिल्या टप्यात कंधार-लोहा विधानसभा मतदार संघाची चाचपणी केली.

सरकार विरोधात संताप व्यक्त करणाऱ्या विधानसभेतील चाळीस गावखेड्यातील नागरिकांशी संवाद साधत विधानसभेची वाट पाडली. सत्तेच्या लालसापासून दूर रहायचे असून वंचित, शोषित, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी सरकारची तीरडी उचलण्यासाठी केवळ पाच आमदार निवडून देण्याची भावणीक साद घालत त्यांनी जिल्ह्यातील कंधार-लोहा, देगलूर- बिलोली, भोकर-मुदखेड, हदगाव-हिमायतनगर या चार विधानसभा लढवण्याचे संकेत दिले.

जिल्ह्याच्या राजकारणात आमदार कडू यांचे आगमन चर्चेचा विषय ठरत असला तरी कडू यांची लोकप्रियता राजकारण्यांना तुर्तास तरी चिंतन करायला लावणार आहे. प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख, आंदोलनाचे प्रमुख समन्वयक ज्ञानेश्वर (माऊली) गिते,  उमाकांत तिडके, प्रितपालसिंह शाहु, गणेश हांडे, विठ्ठल मंगनाळे, संतोष केंद्रे, सुनील हाराऴे, नामदेव कारेगावकर, सुरज चाटे, राजु फुलारी,  अॅड. नागरगोजे,  रामेश्वर महाराज केंद्रे, सखाराम केंद्रे, ओमकार खेडकर, सरपंच पिराजी धुळगुंडे, विलास केंद्रे, नरेंद्र बल्लोरे आदींची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: MLA Bachu Kadu Check out For four Assembly seats