
'आगामी काळात ते राज्याच्या विकासाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील'
'मोदींचे नेतृत्व अन् योगींचे कर्तृत्व यूपीला उंचीवर नेतील'
उत्तर प्रदेशमध्ये १९८५ नंतर सलग दुसऱ्यांदा विजय मिळवणारा भाजपा हा आघाडीचा पक्ष ठरला आहे. राष्ट्रीय सत्तांतरणाचा पाया म्हणून उत्तर प्रदेशकडे पाहिले जाते. यूपीतील जनतेतेची योगी आदित्यनाथ यांच्यावर श्रद्धा आहे, त्यामुळे आगामी काळात ते राज्याच्या विकासाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील, असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.
हेही वाचा: रोहित पवारांच्या भाजप-'आप'ला शुभेच्छा अन् सल्लाही; म्हणाले...
ते म्हणाले, राष्ट्रीय सत्तांतरणाचा पाया म्हणून उत्तर प्रदेशकडे बघितले जाते. उत्तर प्रदेशातील जनतेतेची योगी आदित्यनाथ यांच्यावर असीम श्रद्धा आहे. आगामी काळात ते राज्याच्या विकासाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील. गेल्या पाच वर्षात उत्तर प्रदेशात झालेला विकास, महिला सुरक्षेत झालेली वाढ योगींच्या विजयासाठी महत्वाची ठरल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, योगी आदित्यनाथ यांच्या कुशल प्रशासनात झालेल्या निवडणुकीचा विजय ऐतिहासिक मानावा लागेल. आमदार बावनकुळे हे योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघाचे प्रभारी होते. यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, गोरखपूरमध्ये योगदान देण्याचे भाग्य लाभले. ही संधी म्हणजे एकप्रकारची गोरक्षनाथ पिठाची सेवा होती. तेथे कसलाही भेदभाव नव्हता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जनतेचा विश्वास स्पष्ट दिसून येतो. आजचा विजय हा उत्तर प्रदेशाच्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
हेही वाचा: 'आम्ही २०२४ ची तयारी केलीय', गोव्यात विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Web Title: Mla Chandrashekhar Bawankule Yogi Adityanath Up Development Increased
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..