रोहित पवारांच्या भाजप-'आप'ला शुभेच्छा अन् सल्लाही; म्हणाले...

'आप'ची व्यूहरचना आणि उत्तर प्रदेशमध्ये 'सपा'ने दिलेली फाईट निश्चितच प्रशंसनीय'
politics
politicsesakal
Summary

'आप'ची व्यूहरचना आणि उत्तर प्रदेशमध्ये 'सपा'ने दिलेली फाईट निश्चितच प्रशंसनीय'

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपुर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Election Results) आज लागले. यापैकी पंजाबमध्ये आप वगळता इतर चार राज्यांमध्ये भाजपने आपला डंका वाजवला तर काँग्रेसने (Congress) एकाही राज्यात बहुमत मिळवलेलं नाही. यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार टोलेबाजी सुरु झाली आहे. आता पाच राज्यातील निकालांवरून महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्ताधाऱ्यांकडून खोचक प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे रोहित पवार (Rohti Pawar) यांनीही आता भाजप आणि 'आप'ला टोले लगावले आहेत.

राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यात मिळालेल्या यशाबद्दल भाजपाचं आणि पंजाबमधील यशाबद्दल आम आदमी पार्टीचं मनःपूर्वक अभिनंदन!, हे दोन्ही पक्ष सर्वसमावेशक विकासाचं राजकारण करतील, हीच अपेक्षा! 'आप'ची (Aam Aadami) व्यूहरचना आणि उत्तर प्रदेशमध्ये 'सपा'ने दिलेली फाईट निश्चितच प्रशंसनीय आहे, असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, आता महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामुळे सर्वच पक्ष आपापल्या कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच पक्षांना आपापल्या ताकदीचा अंदाच आला आहे. यामुळे ते समोरची निवडणूक आपणच जिंकू असे सांगत आहे. आता पुन्हा एकदा या मुद्द्यांवरून राज्यात भाजप आणि महाविकास आघाजडी सरकार यांच्यात कोणते टोलेबाजी होणारे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहित पवार यांच्या या ट्विटवरुन आता पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटणार का यावर चर्चा सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com