"गुलाबरावांना कंटाळून सेना सोडली पण तेच पदरात पडले"; बंडखोराचा कॉल व्हायरल

त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
Gulabrao Patil
Gulabrao PatilSakal
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी बंड केला आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले. दरम्यान शिवसेनेत आपल्याला चांगली वागणूक मिळत नाही, आपलं म्हणणं ऐकूण घेतलं जात नाही, आपल्याला निधी दिला जात नाही अशा कारणांमुळे शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड पुकारलं होतं.

यानंतर शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील यांचा कार्यकर्त्यांसोबत झालेल्या संवादाचा एक फोन कॉल व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते "गुलाबरावांना कंटाळून सेना सोडली पण तेच पदरात आले." असं ते बोलले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

(MLA Chimanrao Patil Phone Call Viral)

"शिवसेनेच्या स्थानिक लोकांनी मला खूप त्रास दिला, माझ्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही, मला एवढा त्रास दिला की मी त्यांच्यासोबत राहू नये अशी परिस्थिती यांनी निर्माण केली होती. ज्या शिवसेनेतल्या लोकांनी मला पाडलं त्यांना मंत्रिपद दिलं गेलं." अशी खंत एरंडोल मतदारसंघातले आमदार चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्याबद्दल व्यक्त केली आहे.

Gulabrao Patil
शिवसेनेसाठी दिपाली सय्यद यांचं PM मोदींना साकडं!

"यांचा त्रास किती दिवस सहन करू, गुलाबराव पाटलांनी शिवसेना वाढवून दिली नाही, जळगाव जिल्ह्यात शिवसेना संपवणारा माणूस म्हणजे गुलाबराव पाटील." असा आरोप चिमणराव पाटलांनी यावेळी केला आहे. ही गोष्ट मी उद्धव ठाकरे यांना जाऊन सांगितली पण त्यांच्याकडून काहीच कारवाई झाली नाही, उलट त्यांना मंत्रिपद दिलं याचं मला खूप वाईट वाटतं अशी खंत चिमणराव पाटलांनी व्यक्त केली आहे.

ज्या आमदारांनी गद्दारी केली त्यांच्याकडून दहा जन्म सुद्धा उपकार फिटले नसते असं चिमणराव पाटील म्हणाले आहेत. माझ्याशी कोणीही बोलत नव्हते, मला वर येऊ दिलं नाही असं म्हणत त्यांनी गुलाबराव पाटलांवर आरोप केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com